Deepika’s surprise for P. V. Sindhu: पी. व्ही. सिंधूने केलेल्या कौतुकावर दीपिका पदुकोणचं अनोखं उत्तर

बी टाऊन
Updated Sep 09, 2019 | 20:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॅडमिंटन चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने नुकतंच एका मुलाखतीत दीपिका पदुकोणचं कौतुक केलं आहे. त्यावर रिअॅक्ट करत दीपिकाने अनोख्या पद्धीत सिंधूचे आभार मानले आहेत. पाहा नेमकं काय केलं दीपिकाने सिंधूसाठी खास.

deepika padukone surprises p v sindhu with a sweet reply on her praises for deepika
Deepika’s surprise for P. V. Sindhu: पी. व्ही. सिंधूने केलेल्या कौतुकावर दीपिका पदुकोणचं अनोखं उत्तर  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॅडमिंटन चॅम्पियन पी. व्ही. सिंधूकडून दीपिका पदुकोणचं कौतुक
  • दीपिकाकडून कौतुकाची दखल, अनोख्या पद्धतीत मानले आभार
  • “लव्ह यू चॅम्प” म्हणत दीपिकाचं सिंधूसाठी खास सरप्राईज

मुंबई: स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूने जपानच्या निजोमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू बनली ठरली. त्यानंतर सिंधू सगळीकडे चर्चेत आली आणि तिचं प्रचंड कौतुक झालं. या निमित्त तिच्या अनेक मुलाखती देखील रंगल्या. अशाच नुकत्याच झालेल्या तिच्या एका मुलाखतीत तिला तिच्या फेवरेट अॅक्टर्सबद्दल विचारलं गेलं तेव्हा सिंधूने दीपिका पदुकोणचं खूप भरभरुन कौतुक केलं. बॉलिवूडची ए लिस्ट अभिनेत्री असलेली दीपिका तिच्या अभिनय कौशल्यामुळे अनेकांची फेवरेट आहे. तशीच ती आपल्या गोल्डन गर्ल सिंधूची सुद्धा  फेवरेट आहे हे या निमित्त कळलं.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिंधूला तिच्या फेवरेट अॅक्टर्सबद्दल विचारलं गेलं, ज्यावर तिचं उत्तर होतं, “मला महेश बाबू आणि प्रभास खरंच खूप आवडतात. दीपिका पदुकोण सुद्धा खूप संदर आणि हुशार अभिनेत्री आहे.” सिंधूने आपल्याबद्दल इतकं कौतुक केलंय हे दीपिकाला कळताच, दीपिकाने सुद्धा सिंधूचे आभार मानायचं ठरवलं. या हुशार अभिनेत्रीने मात्र एका अनोख्या पद्धतीत सिंधूचे आभार मानले आणि निश्चितंच सिंधूला छान सरप्राईज दिलं. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर जाऊन तिच्या इन्स्टा स्टोरीजमध्ये या मुलाखतीचा एक फोटो शेअर केला. दीपिकाचं कौतुक केलेला भाग या फोटोमध्ये दपिकाने टिपला आणि तो शेअर करत तिने त्याला कॅप्शन दिलं, “लव्ह यू चॅम्प”. दीपिकाच्या या इन्स्टा स्टोरीबद्दल खूपंच कौतुक झालं आणि अनेकांनी त्याची दखल सुद्धा घेतली. दीपिकाची ही अनोखी पद्धत अनेकांना भावली आहे.

 

दीपिकाच्या बाबतीत कौतुक करण्याची ही सिंधूची पहिलीच वेळ नव्हती. मध्यंतरी सिंधूच्या बायोपिकच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर तर अभिनेता सोनू सूदने तिच्या बायोपिकचे सगळे राईट्स विकत घेतल्याचं देखील ठाम झालं. या सिनेमात सिंधूच्या भूमिकेत कोण दिसणार हे मात्र अद्यापतरी निश्चित झालेलं नाहीये. पण मध्यंतरी जेव्हा सिंधूला तिला 'तिची भूमिका कोणी साकारावी असं तिला वाचत आहे?' असा प्रश्न विचारला गेला, तेव्हा तिने तडक 'दीपिका पदुकोण' हे उत्तर दिलं होतं. त्यामुळे हे सुद्धा एक प्रकारचं कौतुकंच होतं. सिंधूच्या या बायोपिकमध्ये तिचे कोच पुलेला गोपीचंदच्या भूमिकेत खुद्द सोनू दिसणार असं बोललं जात होतं. पण हल्लीच ही भूमिका अक्षय कुमार साकारणार असल्याची शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे सिंधूच्या बायोपिकबद्दल नेमकं काय होतंय ते अद्यापतरी समजलं नाहीये. पण एवढं मात्र निश्चित सिंधूला दीपिका ही अभिनेत्री म्हणून निश्चित खूप आवडते म्हणून अनेकदा ती तिचं मनापासून कौतुक करताना दिसते. त्यामुळे सिंधूचा बायोपिक बनल्यास त्यात दीपिका सिंधू म्हणून झळकली तर नवल नसावं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...