दीपिका लाँच करणार ग्लोबल लाइफस्टाइल ब्रँड

ग्लोबल इंडियन आयकॉन दीपिका पदुकोणने लाइफस्टाईल ब्रँडची स्थापना करत असल्याची घोषणा केली. लवकरच त्याचे लाँचिग होईल.

Deepika Padukone to launch own lifestyle brand in 2022
दीपिका लाँच करणार ग्लोबल लाइफस्टाइल ब्रँड 

थोडं पण कामाचं

  • दीपिका लाँच करणार ग्लोबल लाइफस्टाइल ब्रँड
  • भारतात तयार करणार जागतिक किर्तीचा ब्रँड
  • दीपिकाच्या ब्रँडची पहिली श्रेणी सौंदर्य आणि त्वचेच्या देखभाल उत्पादनांवर केंद्रीत

मुंबईः ग्लोबल इंडियन आयकॉन दीपिका पदुकोणने लाइफस्टाईल ब्रँडची स्थापना करत असल्याची घोषणा केली. लवकरच त्याचे लाँचिग होईल. एक असा ब्रँड, ज्याची मुळे भारतात असली, तरीही तो जागतिक पातळीवर पोहोचेल आणि त्याला एक वैश्विक अपील असेल; अगदी दीपिकाच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासाप्रमाणे! दीपिकाच्या ब्रँडची पहिली श्रेणी सौंदर्य आणि त्वचेच्या देखभाल उत्पादनांवर केंद्रीत असून ही श्रेणी खासकरून भारतात रुजलेली आणि विज्ञानाधीष्ठीत असेल. Deepika Padukone to launch own lifestyle brand in 2022

जगातील सर्वात प्रशंसनीय कलाकारांपैकी एक असे दीपिकाचे वर्णन केले जाते. तिच्या कर्तृत्वामुळे ती अलीकडच्या काळातील जागतिक प्रेक्षक आणि ग्राहकांमधला सर्वात प्रभावी आवाज बनली आहे. दीपिकाला 2018 मध्ये टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नामांकित केले होते. 2018 आणि 2021 मध्ये, दीपिकाला वॅरिएटीच्या 'इंटरनॅशनल वुमेन्स इम्पॅक्ट रिपोर्ट' मध्ये फिचर करण्यात आले होते, जे जगभरातील मनोरंजनात महिलांच्या कामगिरीला अधोरेखित करते. सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या ब्रँड्सपैकी एक असलेल्या दीपिकाकडे 100 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांचा विशाल डिजिटल फुटप्रिंट आहे.

स्वतःच्या ब्रँडविषयी दीपिका म्हणाली, "माझा असा विश्वास आहे की भारताची स्थिती नेहमीच अद्वितीय राहिली आहे. उर्वरित जगापर्यंत आपली प्रचंड पोहोच आहे, आपला देश मूल्य, संस्कृती आणि समृद्ध वारसा लाभलेला आहे; ज्याचा आपल्याला अत्यंत अभिमान आहे. म्हणून आमचा प्रयत्न एक असा ब्रँड तयार करण्याचा आहे ज्याची मुळे भारतात असली, तरीही जागतिक पातळीवर पोहोचलेली असतील आणि त्याला एक वैश्विक अपील असेल.” हा ब्रँड 2022 पासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी