Brahmastra 2: अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट तीन भागात येणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहेत. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान कॅमिओमध्ये दिसणार आहे. ब्रह्मास्त्रमध्ये दीपिका पदुकोणचाही कॅमिओ असल्याच्या बातम्या आल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी ब्रह्मास्त्रचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता आणि त्यात त्याची एक झलक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याआधी दीपिका पदुकोण या चित्रपटात जल देवीच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ट्रेलरमध्ये एक दृश्य आहे ज्यामध्ये अभिनेत्री पाण्याच्या मध्यभागी चालताना दिसत आहे आणि चाहत्यांना प्रश्न पडतो की ही दीपिका आहे का?
अधिक वाचा : पूजेच्या गोष्टी हातातून पडल्याने अशुभ मानतात
आता पिंकविलाच्या नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री सिक्वेलमध्ये पार्वतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ब्रह्मास्त्र भाग-2 हा महादेव आणि पार्वतींबद्दल असेल. एका सूत्राने पोर्टलला सांगितले की, “निर्मात्यांनी दीपिका पदुकोणला पार्वतीच्या भूमिकेसाठी फायनल केले आहे. खरं तर दीपिका ब्रह्मास्त्रच्या शेवटी एक कॅमिओ देखील करेल, जी चित्रपटाची कथा दुसऱ्या भागात घेऊन जाईल.
अधिक वाचा :20 सेकंदात 3 केळी सापडली, तर तुम्ही Genius आहात
शिव आणि ईशा या तिन्ही भागांचा भाग राहणार आहेत. तसेच नवीन पात्रांची ओळख करून दिली जाईल, ती सर्व एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. जर हा अहवाल खरा ठरला तर आम्हाला खात्री आहे की दीपिका पदुकोणचे चाहते तिला ब्रह्मास्त्र 2 मध्ये पार्वती म्हणून पाहण्यास उत्सुक असतील.