75th Cannes Film Festival: जगातील सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक असलेल्या कान फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. हे वर्ष बॉलीवूडसाठी सर्वात खास आहे कारण अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील यात आहे पण एक ज्युरी सदस्य म्हणून. दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022मध्ये ज्युरी सदस्य म्हणून सामील झाली आहे. चाहते दीपिकाच्या लूकची आतुरतेने वाट पाहत होते आणि दरवेळेप्रमाणेच यावेळीही तिने चाहत्यांची मने जिंकली.
75 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमधील दीपिका पदुकोणच्या लूकचे फोटोज समोर आले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केलेली सोनेरी आणि काळ्या रंगाची चमकदार पट्टेदार साडी दीपिकाने वेअर केली होती. दीपिकाने या सुंदर साडीसह आंबाडा घातला होता आणि सोन्याचे हेडबँड घातले. यासोबत तिने सब्यसाची ज्वेलरीच्या बंगाल रॉयल कलेक्शनमधील झुमके घातले होते.
दुसरीकडे, दीपिकाच्या मेकअपबद्दल बोलताना, तिने ड्रामाटिक विंग्ड आयलाइनर आणि मस्करा लावला, जो तिचा लुक हायलाइट करत होता. यासोबत तिने न्यूड कलरची लिपस्टिक लावली. दीपिकाचा हा लूक खूपच आकर्षक होता, त्यामुळे तिचा दबदबा निर्माण झाला आहे.
तत्पूर्वी (त्याच दिवशी) उद्घाटन समारंभात, अभिनेत्रीने सब्यसाची प्रिंटेड शर्ट आणि पन्ना हिरवी पँट परिधान केली होती आणि मेसी बन घालून त्यावर स्कार्फने ऍक्सेसरीझ केले होते. तिचा लूक पूर्ण करताना, अभिनेत्रीने मल्टीकलर जेमस्टोन आणि अनकट डायमंडचा नेकलेस आणि डायमंडचे कानातले घातले होते. यासोबत दीपिकाने विंग्ड आयलायनर आणि मस्करा लावला, तर तिने मरून लिप कलरचा वापर केला.
दीपिका पदुकोणसह, इराणी चित्रपट निर्माता असगर फरहादी, फ्रेंच दिग्दर्शक लाडज ली, अभिनेत्री पटकथा लेखक निर्माती रेबेका हॉल, इटालियन अभिनेत्री जास्मिन त्रिंका, स्वीडिश अभिनेत्री नूमी रॅपेस, अमेरिकन दिग्दर्शक जेफ निकोल्स आणि नॉर्वेजियन दिग्दर्शक जोआकिम ट्रायर हे ज्युरीमध्ये आहेत.