Celebrity couple New home : जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 'या' सेलिब्रिटी कपलचा नव्या घरात गृहप्रवेश

बी टाऊन
Updated Aug 20, 2022 | 16:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranveer-Deepika New Home : अभिनेता रणवीर सिंग ( Ranveer Singh ) आणि दीपिका-पदुकोणने (Deepika Padukone ) त्यांच्या नवीन घराची गृहप्रवेश पूजा नुकतीच केली. जन्माष्टमीच्या मुहूर्चातवर या दोघांनी आलिबागमधील त्यांच्या नव्या बंगल्यात गृहप्रवेश पूजा केली. इंस्टाग्रामवर रणवीरने त्याचे फोटो शेअर केले आहे.

 Deepika-Ranveer griha pravesh pooja at Alibaug bungalow
'या' सेलिब्रिटी कपलच्या नव्या घराची खास झलक  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या नव्या घराचा गृहप्रवेश
  • जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सेलिब्रिटी कपलचा नव्या घरात गृहप्रवेश
  • आलिबागमध्ये 22 कोटींना विकत घेतला नवीन बंगला

Ranveer-Deepika New Home : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने ( Ranveer Singh ) शुक्रवारी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर अलिबागमधील त्याच्या नवीन भव्य घरातून 
गृहप्रवेश पूजेचे फोटो शेअर केले. 2021 मध्ये रणवीर ( Ranveer Singh )आणि दीपिकाने ( Deepika Padukone ) 22 कोटी रुपयांना अलिबागमध्ये एक बंगला खरेदी केला होता. ( Deepika-Ranveer griha pravesh pooja at Alibaug bungalow )

फोटोंमध्ये त्यांच्या भव्य घराची झलक दिसत आहे. दीपिका आणि रणवीर गृहप्रवेश पूजा करताना दिसत आहे. होमहवन केल्याचंही या फोटोंमध्ये दिसत आहे. 

दुसर्‍या फोटोत रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या घराचे प्रवेशद्वार दाखवले आहे.

अधिक वाचा : Vastu Tips चुकूनही या दिशेला पाय ठेवून झोपू नका, होईल नुकसान

रणवीर सिंगने त्याचे वडील जुगजीत सुंदरसिंग भवनानी यांच्या ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी या कंपनीसोबत मुंबईत एसआरकेच्या मन्नत या निवासस्थानाजवळील 119 कोटी किमतीचे सी-फेसिंग लक्झरी क्वाड्रप्लेक्स खरेदी केले.

अधिक वाचा : कोलेस्टेरॉलची पातळी कशी नियंत्रित करावी, पाहा पाच सोपे मार्ग

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्यासोबत पीरियड कॉमेडी चित्रपट 'सर्कस' मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट 2022 च्या ख्रिसमसला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

त्याशिवाय, तो करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये देखील दिसणार आहे, ज्यात आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

अधिक वाचा : वजन कमी करण्यासोबतच चिया बिया या आजारांपासूनही वाचवतात


दुसरीकडे दीपिका शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याशिवाय, ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'द इंटर्न' आणि दक्षिणेतील अभिनेता प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'प्रोजेक्ट-के' या पॅन-इंडिया चित्रपटातही दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी