DeepVeer: बिझी शेड्यूलमधून वेळ काढून दीपवीर पोहोचले लग्नाला, अशी केली धमाल

बी टाऊन
Updated Apr 22, 2019 | 13:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Deepika padukone and ranveer singh: बॉलिवूडचं परफेक्ट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांचं मॅरिड लाइफ एन्जॉय करत आहे. नुकतीच दोघांनी एक लग्नाला हजेरी लावली. यावेळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Deepika Padukone and Ranveer Singh
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड स्टार अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सुमारे सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकले. त्यांनी इटलीच्या लेक कोमामध्ये पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं. लग्नानंतरही ही जोडी फक्त पर्सनलच नाही तर प्रोफेशनल लाइफमध्ये एकमेकांना नेहमी सपोर्ट करताना दिसते. रणवीर आणि दीपिकाची जोडी बी-टाउनमधील सर्वात पॉप्युलर जोड्यामधली एक जोडी मानली जाते. गेल्यावर्षी दोघांचं लग्न हा चर्चेचा विषय होता.

रिल लाइफमध्ये रणवीर सिंग आणि दीपिकाची जोडी पहिल्यापासून हिट मानली जाते. त्यातच रिअल लाइफमध्ये देखील या दोघांची जोडी खूपच शानदार दिसते. नुकतेच रणवीर आणि दीपिका मुंबईमध्ये एक लग्न सोहळ्यात पोहचले. यावेळी दीपिकानं पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फ्लोरल साडी नेसली होती. साडीत दीपिका खूप सुंदर दिसत होती. तर कानामध्ये स्टेटमेंट इअररिंग्ज आणि लाल रंगाचा गजरा माळलेला आहे. त्याचबरोबर रणवीर ब्लॅक शेरवानीमध्ये हॅन्डसम दिसत होता. नेहमीप्रमाणे दोघांमधील बॉन्डिंग सर्वांना आकर्षित करत होते. लग्नातील व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Awww This! Precious Them At a Wedding in Mumbai Today --- @deepikapadukone @ranveersingh #MrandMrsRanveersingh

A post shared by #DeepVeer (@deepveerians_) on

 

रणवीर सिंह सध्या फिल्म ‘८३’ची तयारी करत आहे. रणवीर या फिल्ममध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या फिल्मची सर्व स्टार कास्ट सध्या धर्मशालामध्ये क्रिकेटची प्रॅक्टिस करत आहे. फिल्ममध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये म्हणून स्वतः महारथी कपिल देव आणि मोनिंदर अमरनाथ सर्वांना ट्रेनिंग देत आहेत. काही दिवसांपूर्वी या फिल्मचे इनसाइड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.

 

 

तर दीपिका पदुकोण सध्या छपाकच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. ती या चित्रपटात लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत या फिल्मचे बरेचसे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतरची दीपिकाची ही पहिली फिल्म असेल. तिच्याबरोबर या चित्रपटात विक्रांत मेस्सी दिसेल. तर चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Video Mr & Mrs Ranveer Singh at a Wedding in Mumbai Today! --- @deepikapadukone @ranveersingh #MrandMrsRanveersingh

A post shared by #DeepVeer (@deepveerians_) on

 

तर रणवीर सिंगचे लग्नानंतर आतापर्यंत दोन चित्रपट आले आहेत. यातील सिम्बा चित्रपट तर सुपर हिट ठरला आहे. रणवीर आणि दीपिका दोघंही आपल्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहेत. ‘८३’ साठी रणवीर खूप मेहनत करतोय. त्यासाठी विशेष क्रिकेट ट्रेनिंग सुरू आहे. तर ‘छपाक’मधील दीपिकाचा लूक सर्वांचं आकर्षणाचा केंद्र बनलाय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
DeepVeer: बिझी शेड्यूलमधून वेळ काढून दीपवीर पोहोचले लग्नाला, अशी केली धमाल Description: Deepika padukone and ranveer singh: बॉलिवूडचं परफेक्ट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांचं मॅरिड लाइफ एन्जॉय करत आहे. नुकतीच दोघांनी एक लग्नाला हजेरी लावली. यावेळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
Loading...
Loading...
Loading...