धडक फेम अभिनेता इशान खट्टरची बाईक 'Tow' होते तेव्हा...

बी टाऊन
Updated Apr 16, 2019 | 15:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

अभिनेता इशान खट्टरची बॉलिवूड एन्ट्री झाली धडक सिनेमाने. हा तरुण अभिनेता नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो पण नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय ज्यामध्ये इशानची बाईक tow केली जात आहे.

Ishaan Khatter gets fined for parking bike in no parking zone
अभिनेता इशान खट्टरची बाईक टोव होते तेव्हा 

मुंबई: ‘सैराट’ सिनेमाच्या भरघोस यशानंतर बॉलिवूडमध्ये ‘धडक’ हा त्याचा रिमेक बनला, ज्यामधून ईशान खट्टर या तरुण अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. या सिनेमाला 'सैराट' इतकं यश मिळालं नसलं तरी इशान मात्र घराघरात पोहचला. त्याची लोकप्रियता तशी चांगली आहे. त्यामुळे इशान कुठेही दिसला तर त्याच्यासोबत फोटो-व्हिडिओ काढल्या शिवाय त्याचे फॅन्स राहत नाहीत. सध्या इशानचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय पण व्हिडिओ आनंदायी नसून त्यात इशानला फटका लागताना दिसत आहे. इशान वांद्रेच्या एका नामांकित हॉटेलमध्ये गेला असता त्याने त्याची बाईक हॉटेलसमोर पार्क केली होती. पण तिथे नो पार्किंग झोन असल्याने काही वेळातंच तिथे ट्रॅफिक पोलिसांची टोईंग व्हॅन आली. इतर बाईकसोबत इशानची बाईकसुद्धा Tow केली गेली. आपली बाईक जप्त होत आहे असं कळताच इशान ती घेण्यासाठी बाहेर आला आणि 500 रूपये रकमेचा दंड त्याला आकारला गेला असं समजतंय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

ही रक्कम त्याने लगेच भरुन आपली बाईक परत मिळवली खरी पण तेवढ्या वेळात तिथे हजर असेलल्या अनेकांनी आपल्या या लाडक्या हिरोचा व्हिडिओ मात्र बनवून टाकला. शिवाय तो लगेच सोशल मीडियावर व्हायरल ही होताना दिसला. इशान या व्हिडिओमध्ये अगदीत शांत दिसतोय, कुठेही चिडला नाही किंवा त्याने व्हिडिओ काढू नका असं एकदाही म्हटलं नाही. त्याच्या या व्हिडिओमुळे अनेकांनी त्याचं कौतुकही केलं, की जिथे स्टार्स आपला दबदबा दाखवत अनेक ठिकाणी असे दंड नाकारतात, तिथे इशानने मात्र तसं न करता एका सामान्य नागरिकाप्रमाणे आपली चूक कबूल करत दंड भरणं पसंत केलं.

‘धडक’ सिनेमात दिसलेला इशान सध्या तरी सिनेमात दिसत नाहीये, पण अनेक सिनेमांवर त्याचं काम सध्या सुरु आहे असं समजतय. संजय लीला भंसाळी यांच्या एका सिनेमामध्ये इशान दिसणार आहे असं बोलंल जातय. लवकरच या सिनेमाची घोषणा होणार आहे असं सुद्धा बोलंल जात आहे. तर नुकतंच दिग्दर्शक अभिषेक कपूरने इशानला त्याच्या आगामी सिनेमासाठी ऑफर दिली आहे असं ऐकिवात आहे. पुलवामा हल्ल्यावर आधारित हा सिनेमा असून या सिनेमासाठी इशानने होकार दिलेला नाही आहे. त्यामुळे 'धडक'नंतर इशान कोणत्या सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांना भेटणार हे अद्याप तरी स्पष्ट नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
धडक फेम अभिनेता इशान खट्टरची बाईक 'Tow' होते तेव्हा... Description: अभिनेता इशान खट्टरची बॉलिवूड एन्ट्री झाली धडक सिनेमाने. हा तरुण अभिनेता नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो पण नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय ज्यामध्ये इशानची बाईक tow केली जात आहे.
Loading...
Loading...
Loading...