लग्नानंतर दीड महिन्याने दिया मिर्झाने दिली गोड बातमी, चाहत्यांसोबत शेअर केला फोटो

बी टाऊन
Updated Apr 02, 2021 | 12:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपण गर्भवती असल्याची बातमी स्वतःच देत दिया मिर्झाने बेबी बंप फ्लाँट करतानाचा आपला फोटो शेअर केला आहे ज्यानंतर बॉलिवूड तारेतारका आणि चाहते दिया आणि तिचा पती वैभव रेखीचे अभिनंदन करत आहेत.

Dia Mirza
लग्नानंतर दीड महिन्याने दिया मिर्झाने दिली गर्भवती असल्याची बातमी, चाहत्यांशी शेअर केला फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • 15 फेब्रुवारी रोजी केला होता विवाह
  • अनेक कारणांमुळे गाजले होते दिया मिर्झाचे लग्न
  • मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली आहे दिया मिर्झा

व्हॅलेंटाइन डेच्या (Valentine Day) दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात (marriage) अडकलेली दिया मिर्झा (Dia Mirza) लवकरच आई (mother) होणार आहे. तिने आपण गर्भवती (pregnant) असल्याची बातमी (news) स्वतःच देत बेबी बंपसह (baby bump) आपला फोटो (photo) शेअर (share) केल्यानंतर बॉलिवूड तारेतारका (bollywood celebrities) आणि चाहते (fans) दिया (Dia) आणि तिचा पती (husband) वैभव रेखीचे (Vaibhav Rekhi) अभिनंदन (congratulate) करत आहेत. दिया मिर्झाने आपला एक सुंदर फोटो इंन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे ज्याला तिने गोड कॅप्शनही (sweet caption) दिले आहे.

15 फेब्रुवारी रोजी केला होता विवाह

वैभव रेखी आणि दिया मिर्झाने याच वर्षी दीड महिन्यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये विवाह केला होता. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपल्या नात्याबद्दल लोकांना सांगितले होते जे ऐकून चाहतेही चकित झाले होते. त्यांच्या विवाहाचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

अनेक कारणांमुळे गाजले होते दिया मिर्झाचे लग्न

विवाहात दियाने लाल बनारसी साडी परिधान केली होती आणि तिचा लुक अनेक दिवस सोशल मीडियावर गाजत होता. इतरही अनेक कारणांमुळे तिचा विवाहसोहळा चर्चेत होता, खासकरून लग्नातले सर्व विधी महिला पंडिताने केल्यामुळे. आता लग्नानंतर दीड महिन्याने दिया आणि वैभवने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली आहे दिया मिर्झा

सध्या दिया मिर्झा मालदीवमध्ये आपला पती वैभव आणि त्याच्या मुलीसह सुट्टीचा आनंद लुटत आहे. नुकतेच तिने आपले अनेक फोटो शेअर केले होते ज्यात तिचे आपल्या पतीशी आणि त्याच्या मुलीशी असलेले गोड नाते स्पष्ट दिसत होते. आता तिने बेबी बंपसह शेअर केलेला फोटोही मालदीवमधलाच आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी