25 years of Dil To Pagal Hai: 'दिल तो पागल है' सिनेमाला 25 वर्ष पूर्ण, माधुरी-करिश्माने शेअर केली Special पोस्ट

बी टाऊन
Updated Oct 30, 2022 | 20:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

25 years of Dil To Pagal Hai : बॉलिवूडमधील अविस्मरणीय सिनेमांपैकी एक 'दिल तो पागल है' ( Dil To Pagal Hai) या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण (Completed 25 years) झाली. यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांनी सिनेमाशी संबंधित आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या.

Dil To Pagal Hai completed 25 years
'दिल तो पागल है'सिनेमाला 25 वर्ष पूर्ण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'दिल तो पागल है' या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण
  • हा सिनेमा बॉलिवूडमधील सर्वात अविस्मरणीय सिनेमांपैकी एक आहे.
  • माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांनी शेअर केल्या आठवणी

25 years of Dil To Pagal Hai : शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या आयकॉनिक अशा 'दिल तो पागल है'  (Dil To Pagal Hai) या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण (Completed 25 years) झाली. बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय सिनेमांपैकी एक असा हा सिनेमा. सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रिटींनी इंस्टावर अनोख्या पोस्ट शेअर केल्या आहेत. करिश्मा कपूरने आठवणींना उजाळा देत शूटिंगच्या वेळचे फोटो शेअर केले आहेत. तर माधुरीने सिनेमाती गाणं रिक्रिएट केलं आहे. (Dil To Pagal Hai completed 25 years madhuri dixit and karishma kapoor shares special post)

अधिक वाचा : गुलाबी ड्रेसमधील 'ही' मुलगी ओळखा पाहू?

आठवणी कायम लक्षात राहतात

दिल तो पागल है' सिनेमाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात करिश्माने सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये करिश्माने लिहिले की, 'मेमोरीज दॅट फॉर एव्हर'. करिश्माने अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात ती माधुरी, शाहरुख आणि यश चोप्रासोबत दिसत आहे.


माधुरी दीक्षितने रिक्रिएट केला डान्स

सिनेमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात माधुरी दीक्षितनेही एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. माधुरीने 'दिल तो पागल है' या सिनेमातील 'अरे रे ये क्या हुआ' या प्रसिद्ध गाण्यावरील डान्स रिक्रिएट केला आहे. माधुरी दीक्षितचा हा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. कमेंट सेक्शनमध्येही चाहते प्रतिक्रिया देत आहेत. 
एका चाहत्याने म्हटले, 'कोण म्हणतं 25 वर्षे झाली, असे वाटते की ही कालचीच गोष्ट आहे'. सिनेमातील माधुरी आणि शाहरुखची केमिस्ट्री अफलातून होती. यश चोप्रा स्टाइल या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या सिनेमातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठी आहेत. सिनेमातील गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत. 

अधिक वाचा : बिग बॉस मराठीमध्ये होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री

सिनेमाला 3 राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत


'दिल तो पागल है' हा सिनेमा आजही अनेकांच्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. या ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त व्यवसाय केला. 'दिल तो पागल है' या सिनेमातील भूमिकेसाठी करिश्मा कपूरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सिनेमाला एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी