कंगना राणावतसोबतच्या ट्विटरयुद्धाचा दिलजीत दोसांझला झाला मोठा फायदा

बी टाऊन
Updated Dec 05, 2020 | 14:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

कंगना राणावत आणि दिलजीत दोसांझ यांच्यात ट्विटरवर झालेल्या शाब्दिक युद्धाचा या पंजाबी गायकाला चांगलाच फायदा झाला आहे. त्याच्या फॉलोवर्सच्या संख्येत तब्बल चार लाखांनी वाढ झाली आहे.

Kangana Ranaut and Diljit Dosanjh
कंगना राणावतसोबतच्या ट्विटरयुद्धाचा दिलजीत दोसांझला झाला मोठा फायदा 

थोडं पण कामाचं

  • दिलजीत दोसांझ आणि कंगना राणावत यांच्यात रंगले होते शाब्दिक युद्ध
  • कंगना राणावतने दिलजीतला म्हटले होते करण जोहरचा पाळीव कुत्रा
  • कंगना आणि दिलजीतच्या या युद्धाचा मोठा फायदा दिलजीतला

मुंबई: दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि कंगना राणावत (Kangana Ranaut) या दोघांमध्ये ट्विटरवर (Twitter) शाब्दिक युद्ध (verbal war) चालू होते. शेतकरी आंदोलनावरून (farmers’ agitation) या दोन सेलिब्रिटीजमध्ये ट्विटरयुद्ध रंगले होते. मात्र याचा फायदा (benefit) दिलजीत दोसांझला मिळाला आहे. न्यूज18च्या माहितीनुसार दिलजीत दोसांझ आणि कंगना राणावत यांच्यात रंगलेल्या या युद्धामुळे दिलजीतच्या फॉलोवर्सच्या संख्येत (number of followers) चार लाखांनी वाढ (increased by 4 lakhs) झाली आहे. आता दिलजीतच्या फॉलोवर्सची संख्या ४३ लाखांवर गेली आहे.

इंस्टाग्रामवरही दिलजीतचे फॉलोवर्स वाढले

ट्विटरशिवाय इंस्टाग्रामवरही दिलजीत दोसांझच्या फॅन फॉलोविंगमध्ये वाढ झाली आहे. कंगनाशी झालेल्या चकमकीनंतर दिलजीतचे दोन लाख फॉलोवर्स वाढले आहेत. इंस्टाग्रामवर आता त्याचे एक कोटी सात लाख फॉलोवर्स झाले आहेत.

https://scontent-del1-1.cdninstagram.com/v/t51.2885-15/sh0.08/e35/p640x640/121710513_337146537382968_4853745352393292060_n.jpg?_nc_ht=scontent-del1-1.cdninstagram.com&_nc_cat=1&_nc_ohc=NO9xGiQYUmcAX8KUYNN&tp=1&oh=9d193091d38b5081c488864db7e63b83&oe=5FF42EC9

आजींचा एक व्हिडिओ केला होता पोस्ट

शाहीन बाग आणि शेतकरी आंदोलनात दिसलेल्या एका वयस्कर महिलेवरून कंगनाने ट्विटरवर या प्रकाराला सुरुवात केली होती. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते, ‘लज्जास्पद... शेतकऱ्यांच्या नावावर सर्वजण आपापल्या पोळ्या भाजून घेत आहेत.’ या कंगनाच्या ट्वीटवर आक्षेप घेत दिलजीतने लिहिले होते, ‘या महिंदर कौर आहेत. इतकेही आंधळे असू नये.’ यानंतर कंगनाने हे ट्वीट डिलीट केले होते.

दिलजीतला म्हटले करण जोहरचा पाळीव कुत्रा

कंगना राणावतने दिलजीत दोसांझला करण जोहरचा पाळीव कुत्रा म्हटले होते. तिने लिहिले होते, ‘अरे करण जोहरच्या पाळीव कुत्र्या, ज्या आजी शाहीन बागेत आपल्या नागरिकतेसाठी आंदोलन करत होत्या त्याच बिलकिस बानो आजी शेतकऱ्यांसाठीही आंदोलन करताना दिसल्या.

महिंदर कौर कोण आहेत हे मला माहितीही नाही. काय नाटक चालवले आहे तुम्ही? हे लगेच थांबवा.’ दिलजीतने कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत लिहिले होते, ‘जितक्या लोकांसोबत तू काम केलेस, त्या सर्वांची तू पाऴीव प्राणी आहेस का? मग तर मालकांची यादी फारच मोठी होईल.’   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी