Diljit Dosanjh Birthday: दिलजीत दोसांझची संपत्ती पाहून तुम्हालाही बसेल धक्का; तरीदेखील पत्नी प्रसिद्धीपासून चार हात राहते लांब

Diljit Dosanjh property : प्रसिध्द पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा आज वाढदिवस आहे. त्याचा ६ जानेवारी १९८४ रोजी जन्म झाला होता. ब्लॉकबस्टर पंजाबी चित्रपट जट अँड ज्युलिएट, पंजाब १९८४, 'जेने मेरा दिल लुटेया, डिस्को सिंग' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली.

Diljit Dosanjh property see you will be shocked but Even so his wife too long from popularity
दिलजीत दोसांझची संपत्ती पाहून तुम्हालाही बसेल धक्का  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिलजीत दोसांझकडे जवळपास २५ दशलक्ष डॉलर्स एवढी संपत्ती आहे.
  • लॅम्बोर्गिनी, डू यू नो, ५ तारा, मूव्ह यू लक, हो गया ताली, प्रॉपर पटोला, पैगे वाला, मुंडा, पॉपलिन, इक कुडी जिदा नाम आणि ब्यूटीफुल बिलों यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेला दिलजीत दोसांझ विवाहित आहे.
  • दिलजीतच्या पत्नीचे नाव संदीप कौर आहे.

Diljit Dosanjh Net worth | नवी दिल्ली : प्रसिध्द पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh) आज जन्मदिवस (Birthday) आहे. त्याचा ६ जानेवारी १९८४ रोजी जन्म झाला होता. ब्लॉकबस्टर पंजाबी चित्रपट (Punjabi Film) जट अँड ज्युलिएट, पंजाब १९८४, 'जेने मेरा दिल लुटेया, डिस्को सिंग' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. त्याचा पहिला पंजाबी चित्रपट 'द लायन ऑफ पंजाब' हा होता. मात्र बॉक्स ऑफिसमध्ये हा चित्रपट खूप फ्लॉप ठरला पण 'लक २८ कुडी दा' चित्रपटातील या एका गाण्याला प्रचंड यश मिळाले. दरम्यान, दिलजीतने पंजाबी इंडस्ट्री सोबतच बॉलिवूडमध्ये (Bollywood) देखील खूप कमी कालावधीत आपली वेगळी ओळख बनवली आहे. गायक (Singer), अभिनेता (Actor) यांसोबतच तो एक चांगला कॉमेडीयन देखील आहे. (Diljit Dosanjh property see you will be shocked but Even so his wife too long from popularity). 

अक्षय कुमार सोबत चित्रपट गुड न्यूजमध्ये त्याने त्याच्या कामगिरीने आणि कॉमेडीने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केले होते. 'उडता पंजाब' या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेद्वारे दिलजीतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माहितीनुसार, दिलजीत दोसांझकडे जवळपास २५ दशलक्ष डॉलर्स एवढी संपत्ती आहे. त्याच्याकडे ४ आलिशान गाड्या आहेत ज्यात फेरारी, ऑडी, मर्सिडीज आणि व्होल्वोचा या गाड्यांचा समावेश आहे. त्याचे मुंबईत एक आलिशान घर असून लंडनमध्येही घर आहे.

अमेरिकेत राहतो दिलजीतचा परिवार

 
लॅम्बोर्गिनी (Lamborghini), डू यू नो, ५ तारा, मूव्ह यू लक, हो गया ताली, प्रॉपर पटोला, पैगे वाला, मुंडा, पॉपलिन, इक कुडी जिदा नाम आणि ब्यूटीफुल बिलों यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेला दिलजीत दोसांझ विवाहित आहे. मात्र दिलजीत विवाहित असल्याची खूप कमी लोकांना माहिती आहे. दिलजीतला त्याच्या कुटुंबाबद्दल सार्वजनिकपणे बोलायला आवडत नाही. दरम्यान दिलजीतची पत्नी आणि मुले अमेरिकेत राहतात. दिलजीतच्या पत्नीचे नाव संदीप कौर (Sandeep Kaur) आहे. त्याने त्याच्या पत्नीला कधीच मांध्यमांसमोर आणले नाही. लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या पत्नीचे फोटो देखील उपलब्ध नाहीत. 
 
दिलजीत दोसांझने कराराच्या कलमात म्हटले की, तो कोणत्याही चित्रपटात अतरंगी किंवा किसिंग सीन करणार नाही. तो शीख समाजाची खिल्ली उडवणारे कोणतेही काम करणार नाही. तसेच तो शीख समाजाबाबत कोणताही विनोद करणार नाही, असाही त्यात समावेश केला आहे. दिलजीत दोसांझ शेवटच्या वेळी सूरज पे मंगल भरीमध्ये फातिमा सना शेख आणि मनोज बाजपेयी सोबत काम करताना दिसला होता. आता तो १९८४ च्या दंगलीवर होत असलेल्या चित्रपटात दिसणार आहे.
 
 
 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी