Prakash Jha Film Matto Ki Saikil : आश्रम (Aashram), आरक्षण (Aarakshan ) आणि गंगाजल (Gangajal) यांसारखे राजकीय, सामाजिक विषयांवर सुपरहिट चित्रपट आणि वेबसीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha ) आता अभिनय विश्वात पाऊल ठेवत आहेत. मट्टो की सायकल (Matto ki saikil) या चित्रपटात प्रकाश झा दिसणार आहेत. या चित्रपटात प्रकाश झा एका मजुराची भूमिका साकारत आहेत ज्यासाठी सायकल हेच त्याचे जग आहे. ही भूमिका प्रकाश झा यांच्याकडे आल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच होकार दिला. हा चित्रपट 16 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ( Director Prakash Jha to act in film Matto ki saikil )
अधिक वाचा : Drugs Controversy नंतर आर्यन खानने शेअर केली 'ही' पोस्ट
या चित्रपटाबद्दल प्रकाश झा सांगतात, 'चित्रपटाची कथा माझ्या हृदयाला भिडली, ही कथा अशा असहाय्य नोकरदारांची आहे जे मोठे महामार्ग, रस्ते आणि पूल बांधतात.
त्यांचे स्वतःचे जीवन अशा खडकाळ वाटांमध्ये अडकून राहते. इथे उजेड नाही, फक्त रात्र जगते. या चित्रपटाने मला माझ्या 1980 च्या दशकातील आठवणींमध्ये नेले,
जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात डॉक्युमेंटरी फिल्म्स आणि 'दामुल' द्वारे केली होती. हा माहितीपटही कामगारांच्या स्थितीवर बनवण्यात आला होता.
प्रकाश झा पुढे म्हणतात, 'जेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ही स्क्रिप्ट माझ्याकडे आणली आणि त्यांनी मला मट्टोची महत्त्वाची भूमिका करायला सांगितली. जेव्हा मी चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा मी केवळ अभिनयालाच होकार दिला नाही तर निर्मितीसाठी मदतीचा हातही पुढे केला. दिग्दर्शक एम गनी म्हणतात की, 'ही एका मजूर आणि त्यांच्या कुटुंबाची कथा आहे, जिथे त्यांची सायकल त्यांना सर्वात जास्त आवडते. हा चित्रपट समकालीन विषयावर असेल, पण त्याची परिस्थिती, घटना, जीवन हे सर्व माझ्या परिस्थितीशी साम्य साधणारं आहे. चित्रपटाचे शूटिंग मथुरा येथे झाले आहे.
अधिक वाचा : चीनमध्ये दुष्काळ आशियातील सर्वात मोठ्या नदीचे पात्र कोरडे
मट्टोच्या सायकलमध्ये, मट्टो हा रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे जो आपल्या चार जणांच्या कुटुंबासाठी पैसे कमवण्यासाठी सायकलने शहरात जातो. तो आणि त्याचे कुटुंबीय जीवनातील साध्या सुखांबद्दल कशी चर्चा करतात हे चित्रपट सांगतो. त्याचे आयुष्य बदलेल का, मट्टो शेवटी नवीन सायकल विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल का?हे सारं काही या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
या सिनेमात अनिता चौधरी, डिम्पी मिश्रा, आरोही शर्मा आणि इधिका रॉय देखील आहेत. सिनेमाचा प्रीमियर 2020 मध्ये 25 व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. 17 व्या वार्षिक दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (SAIFF) चित्रपटाचा यूएस प्रीमियर झाला. येत्याा 16 सप्टेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
अधिक वाचा : जाणून घ्या गणपती बाप्पाशी संबंधित 11 रंजक गोष्टी