भेटा दिशा पटानीच्या मोठ्या बहिणीला, इंडियन आर्मीमध्ये आहे लेफ्टनंट

बी टाऊन
Updated Apr 19, 2019 | 15:12 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

दिशा पटानी बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट आणि क्यूट अभिनेत्री आहे. तिच्याप्रमाणेच तिची बहिण खुशबूही दिसायला सुंदर आहे. नुकताच दिशाने खुशबूचा फोटो शेअर केला. खुशबू सैन्यात लेफ्टनंट आहे.

disha and khushboo
दिशा आणि खुशबू पटानी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूडची सगळ्यात हॉट आणि क्यूट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पटानी. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अॅवॉर्ड शोदरम्यान दिशाने आपल्या बोल्ड ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. दिशा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. कधी टायगर श्रॉफसोबतच्या अफेयर्समुळे तर कधी तिच्या ब्रँड एन्डॉर्समेंटमुळे. नेहमी सर्वांना आपल्या लूकने इंप्रेस करणारी दिशा सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते. 

काही दिवसांपूर्वी दिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर एका खास व्यक्तीसोबत फोटो शेअर केला होता. ही व्यक्ती तिच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची सख्खी मोठी बहीण खुशबू पटानी आहे. खुशबू दिशाइतकीच सुंदर दिसते. 

दिशा आपल्या रिअल लाईफमध्ये आपल्या बहिणीकडून प्रेरणा घेत असते. सोशल मीडियावर खुशबूने आपले अकाऊंट प्रायव्हेट करून ठेवले आहेत. दिशाची मोठी बहीण खुशबू आपल्या लहान बहिणीप्रमाणेच दिसते. दिशा आणि खुशबू यांना एक लहान भाऊ सूर्यांशही आहे. सूर्यांश सध्या शाळेत शिकत आहे. 

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास दिशा सध्या सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'भारत' या सिनेमात दिसणार आहे. तसेच दिशा सिने दिग्दर्शक मोहित सुरीच्या मलंग या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा रोमँटिक हॉरर सिनेमा आहे. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू दिसणार आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भेटा दिशा पटानीच्या मोठ्या बहिणीला, इंडियन आर्मीमध्ये आहे लेफ्टनंट Description: दिशा पटानी बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट आणि क्यूट अभिनेत्री आहे. तिच्याप्रमाणेच तिची बहिण खुशबूही दिसायला सुंदर आहे. नुकताच दिशाने खुशबूचा फोटो शेअर केला. खुशबू सैन्यात लेफ्टनंट आहे.
Loading...
Loading...
Loading...