दिशा पटानीचं नाव आणि चांद्रयान २वरचा ‘हा’ जोक का होतोय व्हायरल

बी टाऊन
Updated Sep 11, 2019 | 15:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिशा पटानीने नुकतंच इस्रोचे आभार मानणारं एक ट्विट केलं होतं. त्यावर तिच्या फोलोवरने शब्दांचा खेळ करत एक भारी जोक केला आणि बघता-बघता त्या जोकने ट्विटरवर हास्यकल्लोळ माजला. कोणता आहे हा जोक ते जाणून घ्या.

disha patani’s name becomes a center of a joke on twitter in regards to chandrayaan 2 launch
दिशा पटानीच्या नावावरुन चांद्रयान २वरचा ‘हा’ जोक होतोय ट्विटरवर व्हायरल, का ते पाहा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • दिशा पटानीच्या नावाच्या उच्चरावरुन ट्विटरवर विनोद निर्मिती
  • असं जोडलं गेलं विक्रम लॅण्डर आणि दिशाचं नाव
  • एका कमेन्टमुळे ट्विटरवर हास्यकल्लोळ

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कायम चर्चेत असते मग ते तिच्या सिनेमांसाठी असो किंवा तिच्या टायगर श्रॉफसोबतच्या रिलेशनशिपसाठी असो. अनेकदा तिच्या नावाचा उच्चारही चुकीचा केला जातो किंवा अनेकदा तिच्या नावाचा योग्य उच्चार कसा करायचा हे अनेकांना कळत नाही आणि याच तिच्या नावाच्या उच्चारावरून सध्या ट्विटरवर एक हास्यकल्लोळ माजला आहे. खरंतर तिच्या नावामुळे नाही तर त्यातून निघणाऱ्या अर्थामुळे एक वेगळाच जोक सध्या गाजत आहे आणि तो सध्या ट्विटरवर व्हायरल सुद्धा झाला आहे. काय नेमकी विनोद निर्मिती झाली आहे आणि नेमका हा काय प्रकार आहे ते पाहा.

तर झालं असं की, दिशानं काही दिवसांपूर्वी इस्रोच्या चांद्रयान २या मोहिमेबद्दल त्यांची प्रशंसा केली आणि आभार देखील मानले होते. त्यासाठी तिनं एक ट्विट केलं आणि त्यात ती म्हणाली, ‘अभिमान आहे सगळ्यांचा जे या चांद्रयान २ मिशनमध्ये सहभागी होते. धन्यवाद इस्रो, तुम्ही अनेकांना प्रेरित केलं आहे तुमच्या या प्रयत्नांमुळे. जय हिंद...’ तिच्या या ट्विटरवर अनेकांनी छान कंमेंट्स तर दिले पण त्यावरील एका कंमेन्टनं लक्ष वेधून घेतलं आणि एक वेगळाच विनोद निर्माण झाला. त्यावर एका फॉलोवरनं कंमेंट केली की, ‘माहित नाही का विक्रम लॅन्डर तुझ्या नावा सारखा वागला. चांद्रयान २ लॅन्डिंग.’ या कंमेंटवर लगेचंच एकापेक्षा एक धमाल कंमेंट्स येऊ लागल्या. एकानं त्यावर लिहिलं म्हणजे ‘दिशा पता नही’ तर दुसऱ्यानं लिहिलं, ‘लॉल... मला जवळपास एक संपूर्ण मिनीट लागला हे समजायला पण जेव्हा समजलं तेव्हा मी खूप हसलो...’ तसंच अजून एक ट्विटर युझर यावर ट्विट करत म्हणाला, ‘उशीरा समजलं पण खूप आवडलं...’

 

 

 

 

या धमाल ट्विटवर अजून बरेच रिस्पॉन्स आले आहेत, इथे पाहा आणि तुम्ही सुद्धा खूप हसाल हे निश्चित,

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यावर खुद्द दिशानं अद्यापतरी काही रिअॅक्ट केलेलं नाही आहे. त्यावर तिचं काय मत आहे हे बघायला नक्कीच धमाल येईल. सध्या या ट्विटमध्ये केलेल्या मार्मिक शब्दखेळामुळे ट्विटरवर खूप धमाल सुरु आहे. सध्या ट्विटरवर दिशाच्या नावाची धमाल तर सुरु आहेच आणि त्यामुळे दिशाच्या नावाची एक वेगळीच चर्चा सुरु आहे. पण त्या व्यतिरिक्त या ग्लॅमरस अभिनेत्रीला लवकरच तिच्या आगामी सिनेमात पाहता येणार आहे. अली अब्बास जफरच्या मल्टी स्टारर भारत सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ, तब्बू, सुनील ग्रेव्हर अशा स्टारकास्ट बरोबर सिझलिंग अवतारात दिसलेली दिशा आता लवकरच मलंग सिनेमात दिसणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या सिनेमात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुनाल खेमु देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. दिशाचा हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिशा पटानीचं नाव आणि चांद्रयान २वरचा ‘हा’ जोक का होतोय व्हायरल Description: दिशा पटानीने नुकतंच इस्रोचे आभार मानणारं एक ट्विट केलं होतं. त्यावर तिच्या फोलोवरने शब्दांचा खेळ करत एक भारी जोक केला आणि बघता-बघता त्या जोकने ट्विटरवर हास्यकल्लोळ माजला. कोणता आहे हा जोक ते जाणून घ्या.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय