Disha Patani Photo: दिशा पटानी म्हणतेय "Missing My...", टायगर श्रॉफसोबत ब्रेक-अपनंतर दिशाची पोस्ट चर्चेत

बी टाऊन
Updated Sep 24, 2022 | 18:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Disha Patani Latest Photos: दिशा पटानीने (Disha Patani) तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंसह दिशाने शेअर केलेली पोस्टही सध्या खूपच चर्चेत आहे.

Disha patani shares a heartfelt note after broke up with tiger shroff missing my
दिशा पटानीची 'ती' पोस्ट चर्चेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिशा पटानीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत
  • दिशा पटानीची पोस्ट शेअर होताच सुमारे 2.5 लाख लाईक्स
  • टायगर श्रॉफसोबत ब्रेक-अपनंतर पहिल्यांदाच दिशाने शेअर केली अशी पोस्ट

Disha Patani Beautiful Photos: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या सुंदर लूक आणि फोटोंनी सोशल मीडियावर कायम हीट असते. मात्र, यावेळी दिशा पटानीने सोशल मीडियावर तिने काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत जे काही मिनिटांतच व्हायरल झाले आहेत. यासोबतच या फोटोंचे कॅप्शनही चर्चेत राहिले आहे. टायगर श्रॉफसोबत (Tiger shroff) ब्रेक-अप झाल्यानंतर पहिल्यांदाच दिशा पटानीने अशी पोस्ट शेअर केली आहे. (Disha patani shares a heartfelt note after broke up with tiger shroff missing my)

दिशा पटानीला प्राणी खूप आवडतात

दिशा पटानी फिटनेस फ्रीक असण्यासोबतच प्राणीप्रेमी आहे. तिच्याकडे दोन पाळीव कुत्री आहेत. त्यातील एकाचे नाव आहे बेला तर दुसऱ्याचे गोकू.दोन कुत्र्यांसोबतच तिच्याकडे मांजरही आहे. सध्या दिशा तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे तिला तिच्या पाळीव प्राण्यांना हवा तसा वेळ देता येत नाही. तिला त्यांची कमी जाणवत असल्याचं तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर म्हटलं आहे. 

अधिक वाचा : उर्फी जावेद 'या' अवतारामुळे पुन्हा एकदा ट्रोल

दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती तिचा कुत्रा बेलासोबत दिसत आहे. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये दिशा पटनीने बेलाला मिठी मारली आहे आणि ती त्याला प्रेमाने कुरवाळत आहे. ही पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Missing my belu'. याआधीही अभिनेत्रीचे पाळीव प्राण्यांवरचे प्रेम आपण अनेकदा पाहिले आहे. 

अधिक वाचा : 'या' अभिनेत्रीने केलेला सलमान खानवर बलात्काराचा आरोप

मात्र, टायगर श्रॉफसोबत ब्रेक झाल्यानंतर पहिल्यांदाच दिशाने असे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तिचे हे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिशाच्या या पोस्टने थेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय, दिशा पटानीच्या या पोस्टवर आतापर्यंत सुमारे 2.5 लाख लाईक्स मिळाले आहेत.

दिशाचे आगामी सिनेमा

दिशाच्या वक्रफ्रंटबद्दल बोलायचे तर,  बिग बॅनर, बिग कास्टमध्ये दिशा दिसणार आहे. मलंग 2, आणि वॉरिअर या सिनेमांमध्ये दिशा दिसणार आहे. याआधी अभिनेत्रीने जॉन अब्राहम, तारा सुतारिया, अर्जुन कपूरसोबत 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी