Disha Patani Tiger Shorff Breakup : दिशा पटानी-टायगर श्रॉफचं ब्रेकअप? दिशाचं ६ वर्षांचं एकतर्फी प्रेम तुटलं, जॅकी भिडूनं दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jul 28, 2022 | 11:16 IST

अभिनेत्री (actress) दिशा पटानी (Disha Patani) तिच्या अदांनी नेहमीच घायळ करत असते. परंतु गेल्या सहा वर्षापासून प्रेम (Love) मिळवण्याच्या प्रयत्नात तिला अपयशी आल्यानं दिशा स्वत: घायळ झाली आहे. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि तिचा ब्रेकअप (breakup) झाल्याची बातमी सध्या बॉलिवूड (Bollywood) आणि सोशल मीडियावर (social media) खूप व्हायरल होत आहे.

Disha Patani Tiger Shorff
टायगरला इम्प्रेस करण्याचा दिशाचा 6 वर्ष अपयशी प्रयत्न  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दिशाचे टायगरच्या कुटुंबाशी, विशेषत: त्याची आई आणि बहिणीशी दिशाचे चांगले संबंध आहेत.
  • मी त्याला इम्प्रेस करण्याचे सगळे प्रयत्न केले- दिशा पटानी
  • एकतर्फी संबंध भावनिकदृष्ट्या संपुष्टात आले आणि त्यातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला

मुंबई : अभिनेत्री (actress) दिशा पटानी (Disha Patani) तिच्या अदांनी नेहमीच घायळ करत असते. परंतु गेल्या सहा वर्षापासून प्रेम (Love) मिळवण्याच्या प्रयत्नात तिला अपयशी आल्यानं दिशा स्वत: घायळ झाली आहे. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि तिचा ब्रेकअप (breakup) झाल्याची बातमी सध्या बॉलिवूड (Bollywood) आणि सोशल मीडियावर (social media) खूप व्हायरल होत आहे. दरम्यान आता दोघांचे ब्रेकअप प्रत्यक्षात झाले की नाही हे लवकरच कळलेले नाही. मात्र दिशा-टायगरच्या ब्रेकअपच्या बातमीवर अभिनेता (Actor) जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांची प्रतिक्रिया आली आहे. 

दिशाचे टायगरच्या कुटुंबाशी, विशेषत: त्याची आई आणि बहिणीशी दिशाचे चांगले संबंध आहेत. दिशा आणि टायगर गेल्या 6 वर्षांपासून डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या 1 वर्षापासून त्यांच्यात काही चांगले चालत नव्हते अशाही बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत. त्यामुळे अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

दिशाच्या प्रेमाला नाही मिळाली दिशा

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी या जोडीची गणना बॉलीवूडच्या अशा जोडप्यांमध्ये केली जाते जे कधीही त्यांच्या प्रेमावर उघडपणे बोलले नाहीत, तरीही साऱ्यांनाच ते डेट करत असल्याचं माहीत होतं किंवा किमान तसं वाटत होतं. दोघांनी याबद्दल कोणतंही भाष्य केलं नसलं तरी गेल्या सहा वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत आणि फक्त चांगले मित्र आहेत असंच सांगितलं जात होतं. दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं जात होतं. दोघांच्या आवडी निवडी समान होत्या. डिनर आउटिंग आणि मालदीवला एकत्र व्हेकेशनमुळे ही गोष्ट सहज कळ होती. अनेक मुलाखतीत टायगर त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलला नसला तरी दिशा मात्र बहुतेक मुलाखतीत मात्र त्याबाबत सुगावा देत होती. 

Read Also : OMG: या ठिकाणी सापडला दुर्मिळ गुलाबी हिरा

2019 मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीतही ती बरंच बोलली ज्याचा संदर्भ आता लागत आहे. दिशाला टायगरसोबतच्या बॉण्डिंगबद्दल आणि नात्याबद्दल विचारले असता, अभिनेत्री म्हणाली, 'आम्ही दोघेही फिटनेसबाबत अधिक जागरुक आहोत. पण टायगर फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करतो.' पुरुषांमध्ये तिची फॅन फॉलोअर्स मोठी असली तरी, दिशाने सांगितले की तिला कोणत्याची पुरुषाकडून आतापर्यंत अटेंशनन मिळालेलं नाही. ती म्हणाली की, 'हे सामान्य आहे की नाही माहीत नाही, परंतु मला कधीही डेटसाठी कोणीही विचारले नाही किंवा प्रपोज केलं नाही. मी खोटं बोलत नाही. मला मुलांकडून असं कोणत्याही प्रकारचं अटेंशनच कधी मिळालं नाही.'

टायगरच्या आवडी जपल्या पण ठरल्या व्यर्थ

टायगरनेही तुला कधी अटेंशन दिलं नाही का? असा प्रश्न विचारला असता दिशा म्हणाली, 'मी खूप दिवसांपासून टायगरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला माझ्यात रस नाही असंच दिसतं. आम्ही जेवायला, फिरायला जातो, पण मला मैत्रीपेक्षा जास्त हवंय, मात्र तसं होत नाहीये. आम्ही यापेक्षा जास्त जवळ असावं असं मला वाटतं, परंतु हे एकतर्फी प्रेम आहे. मी त्याला इम्प्रेस करण्याचे सगळे प्रयत्न केले. जिम्नॅस्टिक्स, फिटनेस आणि बरेच काही त्याच्यासाठी, पण काही उपयोग झाला नाही.' 

Read Also : स्मिता ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने अनेकांना धक्का

अनेक वर्ष दिशा प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. दिशाला आशा होती की काळासोबत परिस्थिती बदलेलं आणि तो ही तिच्या प्रेमात पडेल, पण तसं झालं नाही. एकतर्फी संबंध भावनिकदृष्ट्या संपुष्टात आले आणि त्यातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. काही काळ त्रास झाला आणि शेवटी त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.'

काय म्हणाले जॅकी भिडू 

जॅकी श्रॉफ यांनी मुलाच्या ब्रेकअपच्या प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, दिशा-टायगर नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. मी मुलांच्या प्रयव्हसीमध्ये जास्त पडत नाही, पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात, अशी पहिली प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांनी दिली आहे.

Read Also  : आज गटारी अमावस्या,असं का पडलं नाव जाणून घ्या

त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे

याबाबत आणखी बोलतना जॅकी यांनी सांगितले की हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे. त्यांनी स्वतःच याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यांना एकत्र रहायचे आहे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. ते एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही? ही त्यांची प्रेमकहाणी आहे. माझी आणि माझ्या पत्नीसारखी आमची स्वतःची प्रेमकहाणी आहे. दिशासोबत आमचे चांगले ट्युनिंग आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा ते बोलतात तेव्हा ते आनंदी दिसतात.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी