Disha patani photo : दिशा पटानीचा हॉट बिकिनी लूक, अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते घायाळ

Disha patani hot and bold photo : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या सोशल अकाऊंटवर पुन्हा एकदा एक अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बीचवर बिकिनीमध्ये दिसत आहे. तिचे हे सिझलिंग फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Disha Patani's hot bikini look
दिशा पटानीचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिशा पटानीचा हॉट बिकिनी लूक
  • दिशाने बीचवरील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
  • दिशाचा सिझलिंग लूक आणि चाहते घायाळ

Disha patani hot and  bold photo update : मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या सोशल अकाऊंटवर पुन्हा एकदा एक अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बीचवर बिकिनीमध्ये दिसत आहे. तिचे हे सिझलिंग फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोमुळे दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली काही तासांपूर्वी शेअर केलेला तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


दिशाचा हॉट आणि बोल्ड बिकिनी फोटो 


दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते, ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी नेहमीच मनोरंजक पोस्ट शेअर करताना दिसते. याआधीही तिने अनेकवेळा बीच किंवा स्विमिंग पूलवरील फोटो शेअर केले आहेत यावेळीही तिच्या या लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. दिशाचा हा फोटो थ्रो-बॅक फोटो आहे की लेटेस्ट आहे हे सांगणे कठीण आहे कारण तिने याबाबत काहीही सांगितलेले नाही. कॅप्शनमध्ये तिने फक्त सूर्यास्ताचा इमोजी टाकून आपल्या भावना शेअर केल्या आहेत. फोटो बघितला तर एका छानशा संध्याकाळचा हा फोटो आहे असे वाटते कारण फोटोच्या मागे ढगांमध्ये लपलेला सूर्य आणि समुद्र खूप छान दिसतो आहे. फोटोत खूप सुंदर लोकेशन दिसत आहे.

फोटोमध्ये दिशाचा सिझलिंग लूक

फोटोमध्ये दिशा मध्यभागी उभी राहून कॅमेऱ्याकडे पाहत आहे. फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही, परंतु ती लाल रंगाच्या बिकिनीमध्ये तिच्या टोन्ड बॉडीवर आश्चर्यकारक दिसते. खुल्या केसांमुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे. सिझलिंग, अमेझिंग, गॉर्जियस, हॉटी, किलर, लवली अशा भन्नाट कमेंट्स दिशाला तिच्या फोटोवर मिळत आहेत. चाहते रेड रोझ आणि रेड हार्ट शेअर करून तिच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.  'दिशाच्या या बिकिनी फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे', असे कमेंट करताना अनेकांनी लिहिले आहे.

'योद्धा' सिनेमात दिशा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, दिशा पटानी आगामी काळात 'योधा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि चित्रपट निर्माता शशांक खेतान निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक जोडी पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे करणार आहेत. 'योद्धा' पुढील वर्षी 11 नोव्हेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी