राजू श्रीवास्तवबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, मॅनेजरचे आवाहन

Don't believe rumors about Raju Srivastava, appeals manager : राजू श्रीवास्तवबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका असे मॅनेजर मकबूल म्हणाला.

Don't believe rumors about Raju Srivastava, appeals manager
राजू श्रीवास्तवबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, मॅनेजरचे आवाहन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राजू श्रीवास्तवबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, मॅनेजरचे आवाहन
  • राजू बेशुद्ध आहे पण ब्रेन डेड झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत - मॅनेजर
  • प्रकृतीत लक्षात येईल अशी सुधारणा झाली नसली तरी उपचार सुरू आहेत - मॅनेजर

Don't believe rumors about Raju Srivastava, appeals manager : प्रसिद्ध कॉमेडिअन राजू श्रीवास्तव (५८) याची प्रकृती गंभीर आहे. प्रकृतीत अद्याप अपेक्षित सुधारणा नाही. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

राजू बेशुद्ध आहे पण ब्रेन डेड झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. प्रकृतीत लक्षात येईल अशी सुधारणा झाली नसली तरी उपचार सुरू आहेत, असे राजूचा मॅनेजर मकबूल म्हणाला. राजूच्या तब्येतीविषयी माहिती प्रसिद्ध करताना किंवा एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगताना श्रीवास्तव कुटुंबाच्या भावनांचा विचार करा असे आवाहन मकबूलने केले. राजू श्रीवास्तवबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका असेही मॅनेजर मकबूल म्हणाला.

जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे राजू श्रीवास्तव बेशुद्ध पडला. त्याला १० ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टर उपचार करत असले तरी राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीत आलेला नाही. राजू हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्याला दहा दिवस झाले तरी त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा नसल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

राजूच्या हृदयाच्या एका भागात आधीपासूनच १०० टक्के ब्लॉकेज होते. अशातच हृदविकाराचा झटका आल्यानंतर राजू बेशुद्ध झाला आणि खाली पडला. यामुळे त्याच्या मेंदूची एक नस दबली. डॉक्टरांनी राजूच्या हृदयात दोन स्टेंट लावले आहेत. 

राजूच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार मेंदूची एक नस दबली आहे आणि ही समस्या बरी होण्यास किमान दहा दिवस लागतील. राजू शुद्धीत नसला तरी त्याने हातापायांची थोडी हालचाल केली होती. यामुळेच राजूवरील उपचार सुरू ठेवायचे असा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. राजू लवकरच बरा होईल अशी आशा त्याच्या कुटुंबियांना आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी