Spider-Man: No Way Home: चुकूनही डाऊनलोड करू नका Spider-Man-No Way Home, एका क्षणात बँक खाते रिकामे होईल

बी टाऊन
Updated Dec 18, 2021 | 15:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Spider-Man: No Way Home:स्पायडर-मॅनचा नवीन चित्रपट Spider-Man: No Way Homeच्या बनावट डाउनलोड लिंकद्वारे सायबर ठग लोकांच्या बँक खात्यांमध्ये घुसखोरी करत आहेत.

Spider-Man: No Way Home movie update
चुकूनही Spider-Man-No Way Home डाऊनलोड करू नका, बँक खाते रिकामे होईल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Spider-Man-No Way Home ने मोडले अनेक रेकॉर्ड
  • बनावट वेबसाईटवरून डाऊनलोड केल्यास एका क्षणात बँक खाते रिकामे होईल
  • साइबर सिक्योरिटी रिसर्चर्सनी दिला इशारा

Spider-Man: No Way Home: द मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नवीन चित्रपट 'Spider-Man: No Way Home' सिल्व्हर स्क्रीनवर रिलीज झाला आहे. रिलीजसोबतच या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. चित्रपटाला मिळालेलं बंपर ओपनिंग सिनेमाची किती क्रेझ आहे हेच सांगते. सायबर फसवणूक करणारे भामटेही याचा फायदा घेत आहेत.

स्पायडरमॅनच्या मोहापायी बँक खाते रिकामे होण्याची भीती

Spider-Man: No Way Home' trailer: The internet is convinced they found  Tobey Maguire and Andrew Garfield's scenes in the Tom Holland-starrer,  thanks to spoilers | English Movie News - Times of India


साइबर सिक्युरिटी रिसर्चर्सने शुक्रवारी इशारा दिला आहे की ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान राहा.मार्वलचा नवीन चित्रपट 'Spider-Man: No Way Home'शी जोडलेल्या फिशिंग लिंकद्वारे हे भामटे लोकांना फसवत आहेत. चित्रपट डाऊनलोड करण्याचे आमिष दाखवून हे ठग लोकांचे बँक खाते रिकामे करत आहेत.Kaspersky च्या संशोधकांनी सांगितले की, चित्रपटाच्या प्रीमियरपूर्वी अशा फसव्या कारवाया वाढल्या आहेत. अनेक बनावट वेबसाइट्सद्वारे लोकांच्या बँक खात्याचे तपशील गोळा केल्याची प्रकरणे समोर आली आहेत.


लोकांकडून क्रेडिट कार्डची माहिती मागवली जात आहे


Spider-Man: No Way Home या चित्रपटाच्या प्रीमियरपूर्वी लोकांना चित्रपट दाखवण्याचे आमिष दाखवून, या वेबसाइटवर लोकांना त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती देऊन नोंदणी करण्यास सांगितले होते. एकदा का ग्राहकांच्या कार्डवरून पैसे डेबिट झाले आणि या सायबर गुन्हेगारांचा डेटा गोळा झाला


सुपरहिरो चित्रपटांची क्रेझ आहे

Spider-Man: No Way Home' new poster unleashes the Multiverse; Tom Holland  starrer to release in India on Dec 17 | English Movie News - Times of India

सायबर-सुरक्षा तज्ञांनी सांगितले की स्पायडर-मॅन चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह आहे, ज्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. Spider-Man: No Way Home हा अपवाद नाही, लोकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सचे चित्रपट पटकन बघायचे आहेत. यामुळे सायबर गुन्हेगारांकडून फिशिंग आणखी वाढते.


बनावट लिंकवरून चित्रपट डाउनलोड करू नका

अहवालात असे म्हटले आहे की सायबर ठग  वेबसाइट्सवर चित्रपटाचे अधिकृत पोस्टर वापरत नाहीत, परंतु त्याऐवजी लोकांची दिशाभूल करण्यासाठी स्पायडर मॅन चित्रपटांच्या फॅन आर्टचा अवलंब करतात. Kaspersky ने लोकांना अशा वेबसाइटवरून चित्रपट डाउनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे, कारण लोकांना या लिंक्सवर इतर अनेक नको असलेले प्रोग्राम डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ज्यामध्ये Adware आणि Trojans व्हायरसचा असण्याची शक्यता असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी