Drishyam 2 Release Date: या दिवशी रिलीज होणार 'दृश्यम 2'; विजय साळगावकरांच्या कुटुंबावर आता कोणतं येणार संकट

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 21, 2022 | 16:45 IST

जय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बू (Taboo) यांच्या 'दृश्यम 2'  (Drishyam 2 ) या चित्रपटाच्या (Movies) दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता दृश्यम 2 बद्दल एक मोठे अपडेट आली असून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'दृश्यम 2' या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. यावेळी अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त अक्षय खन्ना देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Drishyam 2 Release Date
'दृश्यम 2 : विजय साळगावकरांच्या कुटुंबावर कोणतं येणार संकट?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त अक्षय खन्ना देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत
  • दृश्यम 2 18 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होईल
  • दृश्यम 2 च्या प्रदर्शनावेळी राजकुमार राव आणि अभिनव सिन्हा यांचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Drishyam 2 Release Date. अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बू (Taboo) यांच्या 'दृश्यम 2'  (Drishyam 2 ) या चित्रपटाच्या (Movies) दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता दृश्यम 2 बद्दल एक मोठे अपडेट आली असून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'दृश्यम 2' या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. यावेळी अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त अक्षय खन्ना देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अजय देवगण, तब्बू यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली आहे.  दृश्यम 2 18 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होईल (दृश्यम 2 रिलीज तारीख). या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. चित्रपटाच्या शेड्यूलचे शूटिंग मुंबई, गोवा येथे झाले आहे. याशिवाय हैदराबादमध्ये शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग सुरू आहे. दृश्यम 2 च्या प्रदर्शनावेळी राजकुमार राव आणि अभिनव सिन्हा यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भिडणार आहे. चित्रपटात राजकुमार रावशिवाय भूमी पेडणेकर आणि दिया मिर्झा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

सात वर्षांनी कथा पुढे सरकेल

दृश्यम हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा अजय देवगण आणि कुटुंबाभोवती फिरते. अजय देवगणने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आयजीपी मीरा देशमुख यांच्या भिडला होता. त्याचवेळी, ताज्या वृत्तानुसार, चित्रपटाची कथा आता सात वर्षांनी पुढे सरकणार आहे. हा चित्रपट साऊथच्या दृश्यम 2 या चित्रपटाचा रिमेक आहे. दृश्यम 2 19 फेब्रुवारी 2021 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. या चित्रपटात साऊथचा लोकप्रिय अभिनेता मोहनलाल मुख्य भूमिकेत होता. दृश्यमच्या पहिल्या भागात अजय देवगण व्यतिरिक्त तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर दृश्यम भाग २ मध्ये अजय देवगण विजय साळगावकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अक्षय खन्ना आणि रजत कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी