ड्रग केस: एनसीबीचा एका टीव्ही कलाकाराच्या घरावर छापा; एजाज खानच्या चौकशीनंतर केली कारवाई

बी टाऊन
भरत जाधव
Updated Apr 03, 2021 | 16:14 IST

सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात ड्रग्जच्या चौकशी दरम्यान अनेक मोठी नावे समोर आली आहेत.

Drug case: NCB raids TV actor's house
एनसीबीकडून एजाज खानची चौकशी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • एजाज खानची नारकोटिक्स नियंत्रण ब्युरोकडून आठ तास चौकशी
  • छापा टाकण्याच्या काही मिनिटांआधी टीव्ही कलाकार परदेशी महिलेसह फरार
  • टीव्ही कलाकाराच्या घरातून ड्रग्स जप्त

मुंबई:  सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात ड्रग्जच्या चौकशी दरम्यान अनेक मोठी नावे समोर आली आहेत. आता एनसीबी सतत आपल्या अॅक्शन मोडवर आहे. मागील काही दिवसांपुर्वी टीव्ही अभिनेता एजाज खानला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखीन एका टीव्ही  कलाकाराच्या घरावर (लोखंडवाला) एनसीबीने छापा मारला आहे. ज्यात एनसीबीला ड्रग्ज मिळाले आहे. दरम्यान या टीव्ही कलाकारे नाव समोर आलेले नाही.  

छाप्पा टाकण्याआधी कलाकार फरार 

 एएनआयपासून मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही कलाकारासह एक परदेशी नागरीकता असलेली महिला राहत आहे. दरम्यान छापा टाकण्याच्या काही मिनिटांआधी दोघे तेथून पसार झाले.  मागील बुधवारी अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खानला नारकोटिक्स नियंत्रण ब्युरो (एनसीबी)ने अटक केली. एका दिवसाआधीच त्यांना ड्रग्स केस प्रकरणी ताब्यात घेऊ चौकशी करण्यात आली. एनसीबीने आठ तास त्यांची चौकशी केली होती. दरम्यान एजाजने माध्यमांसमोर आपली बाजू मांडताना म्हटलंय की, 'माझ्या घरातून फक्त चार झोपेच्या गोळ्या मिळाल्या होत्या. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला होता. तणावात असताना ती या गोळ्याचा वापर करत होती.'

 


काय आहे  एजाज खान प्रकरण  


ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर एजाज खानचे नाव समोर आले होते. जेव्हा एजाज खान राजस्थानहून मुंबईला परतला होता. त्यानंतर एनसीबीने त्यांना ताब्यात घेतले. एनसीबीच्या टीमने मागील मंगळवारी एजाजच्या अंधेरी  आणि  लोखंडवालातील अनेक ठिकाणी छापेमारी केली.

ड्रग्ज सप्लायर शादाबची अटक 


मागील काही दिवसांपुर्वी एनसीबीने मुंबईच्या मोठ्या ड्रग्स सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाबला अटक केली होती. त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची ड्रग्स मिळाली होती. शादाब बटाटावर बॉलीवूडच्या अभिनेत्यांना ड्रग्स पुरवण्याचा आरोप आहे. आधी फारुख बटाटे विकायचा त्या दरम्यान तो अंडरवर्ल्डमधील काही लोकांच्या संपर्कात आला. आज तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर आहे. आता त्याच्या ड्रग्सचा कारोबार त्याची मुले संभाळतात. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी