ओरिजनल शाहरुखसह डुप्लिकेटही चिंतेत: आर्यन खानच्या ड्रग्स पार्टीमुळे डुप्लिकेट किंग खानवर उपासमारीची वेळ

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 12, 2021 | 13:42 IST

आर्यन खानच्या ड्रग्स पार्टीमुळे किंग खानचा डुप्लिकेटला उपासी राहण्याची वेळ आली आहे.

Aryan Khan's drug party makes Duplicate King Khan starve
आर्यन खानमुळे डुप्लिकेट किंग खानवर उपासमारीची वेळ  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कार्यक्रमाच्या पैशातून राजू रहिकवार मुलांची शाळेची फी भरणार होते.
  • आयोजक म्हणतात की, सध्या नागरिकांमध्ये शाहरुख खान यांची प्रतिमा मलिन झाली आहे.
  • दीड वर्षानंतर शाहरुख खानचे डुप्लिकेट यांना काम मिळू लागली होती.

नवी दिल्ली: बॉलिवूड सुपरस्टार (Bollywood superstar) शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आर्यन खानच्या अटकनेमुळे बॉलिवूड बादशाहच्या कुटुंबाला मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. आर्यनची पार्टी शाहरुख खानसह चाहते आणि शाहरुख खानचा डुप्लिकेटसाठी (duplicate) डोकेदुखी ठरली आहे.

आर्यन खानच्या ड्रग्स पार्टीमुळे किंग खानचा डुप्लिकेटला उपासी राहण्याची वेळ आली आहे. एका बाजुला ड्रग्समुळे आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख खानला मोठं- मोठं ब्रँडनं दोन हात दूर केलं आहे. तर दुसरीकडे शाहरुख खानचा डुप्लिकेटचंही हातातील कामे जाऊ लागली आहेत. 

शाहरुख खानचा डुप्लिकेट आला अडचणीत

एका माध्यमाशी बोलताना शाहरुख खानचा डुप्लिकेट राजू रहिकवार यांनी सांगितले की, त्यांचे दोन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आयोजकांना असं वाटतं की, आर्यन खानच्या वादात अॅक्टरने तेथे उपस्थित राहू नये.  

कोरोनानंतर परत आलं दुसरं संकट

राजू रहिकवार म्हणातात, 'साधरण दीड वर्ष माझ्याकडे कोणतेच काम नव्हते. कोरोना व्हायरसमुळे कोणतेच इव्हेंट होत नव्हते. कोरोनाच्या महामारीनंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली होती. जयपूर 10 ऑक्टोबरला झालेल्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार होतो. एका आठवड्यानंतर त्याच शहरात मी एका गॅदरिगच्या कार्यक्रमात हजेरी लावणार होतो, परंतु दोन्ही कार्यक्रम रद्द झाले'. 

रद्द झाली सर्व कार्यक्रम

राजू म्हणाले, 'आयोजकांनी मला सांगितले की लोक शाहरुख खानच्या सध्याच्या प्रतिमेवर समाधानी नाहीत. ही काळाची बाब आहे. मला खात्री आहे की शाहरुख खान भाई या परिस्थितीतून अधिक मजबूत होतील.  या कार्यक्रमांमध्ये मिळणाऱ्या पैशांमधून मुलांची फी भरण्याचा विचार करत असल्याचे राजू यांनी सांगितले, पण आता त्याला दुसरा पर्याय शोधावा लागेल.

'ते माझे देव आहेत'

शाहरुख खानबद्दल राजू म्हणाला, 'मला त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. मी त्याच्यासाठी माझ्या कार्याचा त्याग करण्यास तयार आहे. माझी ओळख शाहरुख खान भाईमुळे आहे.  आज माझ्याकडे जे काही आहे त्याच कारण मी त्याच्यासारखा दिसतो. ते माझा देव आहेत. 'त्यांचे कुटुंब आता दुखात आहे, मी त्यांचे दु:ख समजू शकतो. मी इतकीच अपेक्षा व्यक्त करतो की आर्यन भाऊ लवकर घरी परत यावं.'


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी