Ekta kapoor and KRK : कमाल खान-एकता कपूरमध्ये शाब्दिक चकमक, "तिचा सिनेमा माझ्यामुळे..."

बी टाऊन
Updated Jul 28, 2022 | 13:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ekta kapoor and KRK : एक व्हिलन रिटर्न्स हा कोरियन सिनेमाची कॉपी असल्याचा आरोप कमाल खान यांनी केला आहे. त्यावर एकता कपूरने तिच्या खास शैलीत या आरोपांना उत्तर दिले आहे. हा सिनेमा इतर कोणत्याही भाषेत झाला नसल्याचं एकताने स्पष्ट केले आहे. एकताने केआरकेवर केलेल्या टीकेला आता कमाल खान यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. अर्जुन कपूर, दिशा पटानी, तारा सुतारिया आणि जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला आणि एकता कपूरची निर्मिती असलेला हा सिनेमा या शुक्रवारी रिलीज होणार आहे.

Ek Villain Returns KRK hits back to Ekta kapoor that her film is not flop because of me
कमाल खान-एकता कपूरमध्ये शाब्दिक चकमक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • समीक्षक कमाल खान यांचा निर्माती एकता कपूरवर आरोप
  • एक व्हिलन रिटर्न्स कोरियन सिनेमाची कॉपी असल्याचा आरोप
  • कमाल खान यांच्या आरोपांना एकता कपूरचे प्रत्युत्तर

Ekta kapoor and KRK : एक व्हिलन रिटर्न्स हा कोरियन सिनेमाची कॉपी असल्याचा आरोप कमाल खान (Kamal Khan ) यांनी केला आहे. त्यावर एकता कपूरने (Ekta Kapoor ) तिच्या खास शैलीत या आरोपांना उत्तर दिले आहे. हा सिनेमा इतर कोणत्याही भाषेत झाला नसल्याचं एकताने स्पष्ट केले आहे. एकताने केआरकेवर केलेल्या टीकेला आता कमाल खान यांनीही प्रत्त्युत्तर दिले आहे. अर्जुन कपूर, ( Arjun Kapoor ) दिशा पटानी ( Disha Patani ), तारा सुतारिया ( Tara Sutariya ) आणि जॉन अब्राहमची ( John Abraham ) प्रमुख भूमिका असलेला आणि एकता कपूरची निर्मिती असलेला हा सिनेमा या शुक्रवारी रिलीज होणार आहे. ( Ek Villain Returns KRK hits back to Ekta kapoor that her film is not flop because of me )

समीक्षक कमाल आर खान उर्फ ​​केआरके यांनी एकता कपूरचा आगामी सिनेमा'एक व्हिलन रिटर्न्स'वरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. एक व्हिलन रिटर्न्स ही कोरियन सिनेमाची कॉपी असल्याचा आरोप केआरकेने केला होता. त्याच्या या आरोपांवर एकताने दिलेल्या प्रतिक्रियेवर कमाल खानने प्रतिक्रिया दिलेली आहे. 

अधिक वाचा : 'या' 5 कारणांमुळे चाळीशीनंतर अचानक वाढतं महिलांचं वजन


केआरकेने सोशल मीडियावर आपले मत शेअर करत एक व्हिडिओ शेअर केला. "एकता कपूर माझ्याशी गैरवर्तन का करत आहे? तिचा सिनेमा माझ्यामुळे फ्लॉप झाला नाही..." असे त्याने व्हिडिओसोबत ट्विट केले आहे. 


इंडिया टुडे नुसार नुकत्याच झालेल्या एक व्हिलन रिटर्न्सच्या पत्रकार परिषदेत, एकता कपूर, (Ekta Kapoor ) अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया उपस्थित होते.पत्रकार परिषदेत एकताला केआरकेच्या आरोपांबाबत विचारण्यात आले. ज्यावर तिने सांगितले की, दिग्दर्शक मोहित सुरीने तिला दोन स्क्रिप्ट्स सांगितल्या आहेत. तेव्हा तिला व्हिलन रिटर्न्सचं स्क्रीप्ट जास्त आवडलं. एकताना यावेळी काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. ती म्हणाली, "रोहित शेट्टीलाही ही स्क्रिप्ट खूप आवडली होती, "मी रोहितकडे गेले आणि मी त्याची बहीण आहे, म्हणून मी त्याला विनंती केली आणि त्याने, चांगल्या भावाप्रमाणे, मला स्क्रिप्ट परत दिली आणि म्हणाला. ही स्क्रीप्ट तुमची आहे. हे स्क्रीप्टचं असं आहे की कोणालाही यावर सिनेमा करायला आवडेल आणि आजपर्यंत या स्क्रीप्टवर कोणत्याही भाषेत सिनेमा झालेला नाही. आता, कोरियन मिस्टर KRK काय पाहत आहेत हे मला माहीत नाही. पण मला वाटते माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे असे दिसते."

अधिक वाचा :  आज आषाढ दीप अमावस्या; जाणून घ्या पूजा, तिथी आणि वेळ


आता त्याच्या व्हिडिओमध्ये, केआरकेने एकता कपूरने दिलेल्या प्रतिक्रियेला उत्तर दिले असून, मोहीत सुरीनं ( Mohit Suri ) एकतासोबत'गेम' खेळल्याचा आरोप केला आहे. त्यांनी एकताच्या ओटीटी प्लॅटफॉर्म AltBalaji वरही टीका केली आहे.

एक व्हिलन रिटर्न्स सिनेमात अर्जुन कपूर, दिशा पटानी, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा एक व्हिलन (2014) चा सिक्वेल आहे. मोहित सुरी दिग्दर्शित फ्रँचायझीच्या पहिल्या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. आता एक व्हिलन रिटर्न्स शुक्रवारी रिलीज होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी