Ekta Kapoor : वडिलांच्या या अटीमुळे 47 वर्षीय एकता कपूर अविवाहित राहिली,प्रत्येकीला हे जमेलच असे नाही

बी टाऊन
Updated Jun 09, 2022 | 13:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ekta Kapoor : एकता कपूर ही आजवर प्रसिद्ध निर्माती असून ती अजूनही कुमारी आहे. टीव्ही क्वीनने लग्न न करण्यामागे तिचे वडील असल्याचे सांगितले होते, वडिलांनी सांगितलेले तिने खूप गांभीर्याने घेतले.

Ekta Kapoor, 47 remains a single, because of her father asked her either you worked or you get married
वडिलांच्या या अटीमुळे एकता कपूर अजूनही कुमारीच  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वडिलांच्या या अटीमुळे एकता कपूर अजूनही कुमारीच आहे
  • एकता कपूरने लग्नाऐवजी कामाची निवड केली
  • सध्याच्या काळात मुलींसाठी स्वावलंबी असणे सर्वात महत्त्वाचे आहे

Ekta Kapoor : टीव्हीच्या यशस्वी निर्मात्यांपैकी एक असलेली एकता कपूर 47 वर्षांची झाली आहे, पण तिने अजून लग्न केलेले नाही, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कायम राहतो. 
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी एकता यांच्या सिंगल असण्याचे मुख्य कारण सांगणार आहोत. लहानपणापासूनच एकता तिचे वडील जितेंद्र यांच्या खूप जवळ आहे आणि त्यांचे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ही टीव्ही क्वीन अनेकदा तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.त्‍यावरून तिचे वडिलांशी किती घट्ट नाते आहे हे दिसून येते. जितेंद्रही नेहमी आपल्या मुलीच्या कर्तृत्वाच्या पाठीशी उभा राहतो. अशातच एकदा जितेंद्रने एकताला काहीतरी सांगितले, ज्यामुळे ती अजूनही कुमारी आहे.


एकताने लग्नाऐवजी कामाची निवड केली


एकता कपूर आज भलेही एक यशस्वी बिझनेस वुमन आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तिला पार्टी करण्याची आणि लग्न करण्याची जास्त क्रेझ होती. वयाच्या १५ व्या वर्षी एकताला तिच्या वडिलांनी पॉकेटमनीशिवाय पैसे नाकारले होते. याचा खुलासा एकतानेच एका मुलाखतीत केला होता की, जेव्हा तिने जितेंद्रला तिच्या लग्नाच्या आवडीविषयी सांगितले तेव्हा अभिनेता म्हणाला,'एकतर तू लग्न कर,किंवा काम कर, मला तू काम करावंस असंच वाटतंय' एकतासाठी, तिच्या वडिलांचे हे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती, आणि त्यानंतर तिने इतक्या समर्पणाने काम सुरू केले की आज ती सर्वात यशस्वी निर्मात्यांपैकी एक आहे.

एकताने अगदी लहान वयात लग्नाऐवजी करिअरला ज्या प्रकारे महत्त्व दिले,ते सर्वांनाच जमत नाही. कधीकधी मुलींना स्वतंत्र असण्याचे महत्त्व खूप नंतर समजते. एकता तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल नेहमीच स्पष्ट असायची.

मुलींसाठी स्वावलंबी असणे सर्वात महत्वाचे आहे

स्वावलंबी असणं किती गरजेचं आहे हे आजच्या मुलींना चांगलंच कळतं. त्यांना कोणत्याही प्रकारे जोडीदारावर अवलंबून राहायचे नाही. त्याचवेळी आई-वडिलांनाही हे चांगलेच समजते, कदाचित त्यामुळेच जितेंद्रने लहान वयातच एकताला असे काही सांगितले होते, ज्यानंतर तिने एक निर्णय घेतला ज्यामुळे तिचे आयुष्य बदलले.लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर, काही काळानंतर स्वतंत्र असणं गरजेचं होतं, ज्यामुळे तुमचा एक वेगळाच आत्मविश्वास वाढतो. मात्र, यशस्वी करिअरनंतरही बहुतांश मुलींना त्यांच्या आयुष्यात चांगला नवरा आणि कुटुंब हवे असते.

स्वातंत्र्य गमावण्याची भीती देखील लग्नापासून दूर ठेवू शकत नाही.

नोकरदार महिलांना लग्नानंतरच्या निर्बंधांची नेहमीच भीती वाटते यात शंका नाही, पण तरीही त्या प्रेमात पडण्यापासून आणि लग्न करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. 
महिलांना व्यावसायिक जीवनात खूप प्रगती करायची असते, परंतु काही काळानंतर त्यांना जोडीदाराची उणीव भासते, आणि त्या लग्न करण्याचा निर्णय घेतात. 


काम आणि घर सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते

सासरच्या घरी काम करणारी विवाहित स्त्री असो की गृहिणी, तिच्यावर घरातील काही कामांची जबाबदारी असते. ती ते खूप चांगले हाताळते. आजकाल नोकरदार स्त्रिया त्यांच्या कामासह  घर अशा प्रकारे व्यवस्थित सांभाळतात की कोणालाही काहीही बोलण्याची संधी मिळत नाही. या कामात पतीही त्यांना साथ देतात,पण असे असतानाही त्यांच्या पत्नीच्या जबाबदाऱ्या घराप्रती अधिक असतात.

दुसरीकडे, सर्व विवाहित जोडपी आनंदी नसतात असं नाही, अनेक घरांमध्ये कामाचा इतका ताण असतो की, इच्छा नसतानाही महिलांना नोकरी गमवावी लागते.केवळ कुटुंब आणि मुलांमुळे ते गप्प राहतात आणि त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत राहण्यास भाग पाडले जाते. अशा परिस्थितीत लग्न करण्यापेक्षा कुमारी राहणे चांगले,असे अनेक महिलांचे मत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी