Ekta Kapoor : एकता कपूरलाही कोरोनाची लागण, स्वतःला केले आयसोलेट, संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करण्याचे आवाहन

Ekta Kapoor COVID 19 Positive: निर्माती एकता कपूरलाही कोरोनाचा फटका बसला आहे. एकता कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली आहे.

Ekta Kapoor is also Corona positive,  isolated herself
जॉन अब्राहमनंतर आता एकता कपूरही कोरोना पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तडाख्यात आले आहे.
  • एकता कपूरलाही कोरोनाचा फटका बसला आहे.
  • एकता कपूरने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

Ekta Kapoor COVID 19 Positive: बी टाऊनमध्येही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव पाहायला मिळत आहे.  एकाच दिवशी एकामागून एक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. जॉन अब्राहमनंतर आता निर्माती एकता कपूरही कोरोनाच्या विळख्यात आली आहे. एकता कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.एकता कूपरने सोशल मीडियावर लिहिले की, 'सर्व खबरदारी घेऊनही माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी बरी आहे आणि मात्र, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी. एकता कपूरच्या पोस्टनंतर टीव्ही सेलिब्रिटी तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. श्वेता तिवारीने लिहिले की, 'स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.' त्याचबरोबर हिना खानने लिहिले की, 'तुम्ही लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते.' त्याचवेळी विक्रांत मॅसीने लिहिले की, 'लवकर बरे व्हा, love u. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)


हे सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात 


एकता आणि जॉन अब्राहमच्या आधी डिसेंबरमध्ये इतर अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर, करण बुलानी, मृणाल ठाकूर कोरोनाच्या विळख्यात आहेत. तर करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ख्रिसमसपूर्वी या दोघींनीही कोरोनावर मात केली, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.


एकताच्या हिट शोचा टीझर रिलीज झाला 

महत्त्वाचं म्हणजे एकता कपूरने 3 जानेवारी म्हणजे आजच तिच्या आगामी मालिका नागिन 6 चा टीझर रिलीज केला आहे. या वर्षी एकता कपूर इतर अनेक शो घेऊन येत आहे. नागिन 6 या महिन्यात 30 जानेवारीला प्रीमियर होणार असल्याच्या बातम्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी