Milind Soman : 'Emergency'सिनेमातील मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक रिव्हिल, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉच्या भूमिकेत दिसणार

बी टाऊन
Updated Aug 25, 2022 | 14:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Milind Soman first look : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी'(Emergency) सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच मिलिंद सोमण (Milind Soman) यांचा सिनेमातील फर्स्ट लूक रिव्हील झाला आहे.

Emergency cinema milind soman first look released
'Emergency'सिनेमाील मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'इमर्जन्सी'मधील मिलिंदचा फर्स्ट लूक समोर आला आहे
  • फील्ड मार्शल 'सॅम मानेकशॉ' यांची भूमिका साकारणार आहे
  • सिनेमात कंगना राणावत साकारणार इंदिरा गांधींची भूमिका

Milind Soman first look : कंगना राणावतच्या  (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमातील एकामागून एक पात्रांचे फर्स्ट लूक्स समोर येत आहेत. कंगना राणावतशिवाय अनुपम खेर (Anupam Kher ), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), महिमा चौधरी (Mahima Chaudhari)
आणि आता मिलिंद सोमण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कंगना रणावतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मिलिंद सोमणचा लूक शेअर केला आहे (Emergency cinema milind soman first look released)
 

कोण आहे सॅम मानेकशॉ

मिलिंद सोनम 'इमर्जन्सी'मध्ये फील्ड मार्शल सॅम मानेकशॉची भूमिका साकारताना दिसणार आहे. सॅमच्या लूकमध्ये मिलिंदला ओळखणे कठीण आहे. सॅमचे पूर्ण नाव सॅम होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी मानेकशॉ होते. भारतीय सैन्यात ते सर्वांचे आवडते होते, सॅम माणेकशॉ यांची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही होती. सॅम मानेकशॉ यांचा जन्म पंजाबमध्ये झाला.

अधिक वाचा : आदित्य ठाकरेंनी काढले थेट 'त्या' आमदारांचे संस्कार

मिलिंद सोमण सॅम मानेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे

कंगना राणावतने मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'सॅम माणेकशॉच्या भूमिकेत मिलिंद सोमण. भारत-पाक युद्धादरम्यान भारताच्या सीमा वाचवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणीबाणीतील एक युद्ध नायक आणि दूरदर्शी नेता अशी त्यांची ओळख होती. 

सिनेमात या कलाकारांच्याही भूमिका

कंगनाच्या Emergency सिनेमात अनेक दिग्गज स्टार्स दिसणार आहेत. या सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर श्रेयस तळपदे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांची भूमिका साकारणार असून महिमा चौधरी पुपुल जयकरच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत या स्टार्सचे सिनेमातील फर्स्ट लूक आपल्यासमोर आलेले आहेत. आता मिलिंद सोमणचाही सिनेमातील फर्स्ट लूक  रिव्हील करण्यात आला.

अधिक वाचा :  राजू श्रीवास्तव १५ दिवसांनी शुद्धीत आला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी