सलग दोन सिनेमांमध्ये झळकणार इमरान हाश्मी

बी टाऊन
Updated Feb 23, 2021 | 17:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

इमरान हाश्मी गेल्या अनेक काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता या वर्षी इमरान हाश्मीचे दोन मोठे सिनेमाता मुंबई सांगा आणि चेहरे केवळ एक महिन्याच्या अंतराने रिलीज होत आहेत.

emraan hashmi
सलग दोन सिनेमांमध्ये झळकणार इमरान हाश्मी 

थोडं पण कामाचं

  • गेल्या अनेक काळांपासून त्याच्या या सिनेमांची सगळे वाट पाहत आहेत.
  • पहिला सिनेमा १९ मार्चला इमरान हाश्मीचा सिनेमा मुंबई सागा हा सिनेमा रिलीज होत आहे.
  • यानंतर इमरान हाश्मीचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा सिनेमा चेहरे ३० एप्रिलला रिलीज होणार

मुंबई: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचे यावर्षी सलग दोन सिनेमे रिलीज होत आहेत. इमरानचे हे दोन सिनेमे मोठे चर्चेत आहेत.. गेल्या अनेक काळांपासून त्याच्या या सिनेमांची सगळे वाट पाहत आहेत. आता अखेर इमरान हाश्मी यांचे सिनेमे मुंबई सागा आणि चेहरे यांच्या रिलीच्या तारखा समोर आल्या आहेत. हे दोनही सिनेमे केवळ एक महिन्याच्या अंतराने रिलीज होत आहेत. 

पहिला सिनेमा १९ मार्चला इमरान हाश्मीचा सिनेमा मुंबई सागा हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमात इमरान हाश्मीसोबत जॉन अब्राहम आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत. संजय गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमत जॉन एका डॉनच्या भूमिकेत तर इमरान हाश्मी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. 

यानंतर इमरान हाश्मीचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा सिनेमा चेहरे ३० एप्रिलला रिलीज होणार. रूमी जाफरी यांचे दिग्दर्शन या सिनेमात लाभले आहे. यासिनेमात हाश्मीव्यतिरिक्त अमिताभ आणि इमरान यांच्याशिवाय रिया चक्रवर्ती,सिद्धांत कपूर, धृतिमान चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूझा, रघुबीर यादव आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत असतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी