अक्षय कुमार आणि 'या' महिलेचं नातं काय ? फोटो व्हायरल...

बी टाऊन
Updated Oct 30, 2019 | 21:06 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बॉलिवूडचा खिलाडी 'अक्षय कुमार' याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका वृद्ध महिलासोबत अक्षय दिसत आहे. 

Entertainment news of akshay kumar his one photo is viral on social media the news in marathi google batmya
अक्षय कुमार आणि 'या' महिलेचं नातं काय ? फोटो व्हायरल... 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा 'हाऊसफुल ४' हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जवळपास १०० कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर अक्षय कुमारचा एक फोटो एका वृद्ध महिलासोबत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये महिलेने निळ्या आणि तपकिरी रंगाचा शर्ट घातला आहे आणि ती एका व्हीलचेअरवर बसली आहे. 

खरं म्हणजे,अक्षय आपल्या कुटुंबातील व्यक्तींना वेळ देण्यासाठी शील्लिम येथे गेला आहे. या फोटोतील वृद्ध महिला ट्विंकल खन्ना हीची आजी बेटी कपाडिया आहे. ट्विंकल खन्ना या अभिनेत्रीने आपल्या आजीच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटची गोष्ट करायची झाली तर, दिवाळीच्या मुहूर्तावर हाऊसफुल ४ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. आता अक्षयचा आगामी चित्रपट 'गुड न्यूज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये अभिनेत्री 'करीना कपूर' ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर  सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब आणि पृथ्वीराज या आगामी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी