ईशा देओलच्या दुसऱ्या लेकीची पहिली झलक, या नावावरून ठेवलं दुसऱ्या लेकीचं नाव

बी टाऊन
Updated Jun 13, 2019 | 17:05 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Isha Deol second child: ईशा देओलनं गेल्या सोमवारी आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. आता ईशा देओलच्या दुसऱ्या लेकीची पहिली झलक बघायला मिळाली आहे. जाणून घेऊया ईशानं आपल्या दुसऱ्या लेकीचं नाव काय ठेवलं. 

Esha Deol
ईशा देओलच्या दुसऱ्या लेकीची पहिली झलक, काय ठेवलं नाव   |  फोटो सौजन्य: Instagram

बॉलिवूड एक्ट्रेस ईशा देओलनं गेल्या सोमवारी आपल्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशानं आपल्या दुसऱ्या लेकीचं नाव मिराया ठेवलं आहे.  ईशा आणि तिच्या पतीनं आपल्या मुलीच्या नावाचा खुलासा सोशल मीडियावर केला. सोशल मीडियावर तेव्हापासून अनेक फोटो व्हायरल होत आहेत. काही वेळापूर्वीच ईशा देओलच्या मुलीचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोंमध्ये ईशाचं संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत आहे. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी हॉस्पिटलमधून निघताना पापाराझीनं त्यांना स्पॉट केलं गेलं. 

ईशाच्या हातात तिची मोठी मुलगी राध्या आहे.  भरतच्या हातात त्यांची छोटी मुलगी मिराया दिसत आहे. चिमुकली मिरायाबद्दल ईशानं पहिलंच मिड-डेला सांगितलं होतं की, भरत आणि मी खूप खूश आहे आणि धन्य सुद्धा. कुटुंबात आणखीन एक मुलगी जन्माला येणं हे अद्भुत आहे. भरत एक भाग्यवान व्यक्ती असेल, जो तीन सुंदर महिलांनी घेरला जाणार आहे. मिराया आणि राध्या एकमेकींसाठी पूरक असतील. या कपलनं इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुलीच्या नावाचा खुलासा करत एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात ईशानं आपल्या फॅन्सचे आभार मानले होते. सध्या बघूया ईशा देओलच्या चिमुकलीचा पहिला फोटो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#eshadeol with new born daughter snapped today after getting discharge!

A post shared by Ajay Surve (@ajaysurve12) on

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमध्ये मिराया हिला बघण्यासाठी जाताना स्पॉट केलं होतं. हेमा मालिनी यांनी आपल्या राजकारणातील व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून ईशाच्या डिलिव्हरीच्यावेळी तिच्यासोबत होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#eshadeol with hubby #bharattakhtani snapped at #hindujahospital

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

ईशानं २०१२ सालच्या फेब्रुवारी महिन्यात बिजनेसमन भरत तख्तानीसोबत साखरपूडा केला होता. त्यानंतर याचवर्षीच्या जून महिन्यात दोघांनी लग्न केलं. त्यानंतर २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात ईशानं आपली पहिली मुलगी राध्याला जन्म दिला. यावर्षी जानेवारी महिन्यात ईशानं राध्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत ईशानं खुलासा केला होता की ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.  ३७ वर्षांची ईशा देओलची आई हेमा मालिनी भगवान कृष्ण यांची भक्त आहे. याव्यतिरिक्त हेमा मालिनी यांचं उत्तर प्रदेशच्या मथुराशी जिव्हाळ्याचं एक नातं आहे. त्यामुळे ईशा आणि भरतनं आपल्या पहिल्या मुलीचं नाव राध्या ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ईशा देओलच्या दुसऱ्या लेकीची पहिली झलक, या नावावरून ठेवलं दुसऱ्या लेकीचं नाव Description: Isha Deol second child: ईशा देओलनं गेल्या सोमवारी आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. आता ईशा देओलच्या दुसऱ्या लेकीची पहिली झलक बघायला मिळाली आहे. जाणून घेऊया ईशानं आपल्या दुसऱ्या लेकीचं नाव काय ठेवलं. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles