Esha Gupta in Aashram 3: 'आश्रम 3' या वेबसिरीजमुळे ईशा गुप्ता सध्या चांगलीच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे अभिनेत्रीला बाबा निरालाची भूमिका करणाऱ्या बॉबी देओलसोबत एक इंटिमेट सीन द्यायचा आहे. अलीकडेच या अभिनेत्रीने तिच्या इंटिमेट सीनबाबत मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती हे सीन कसे शूट करते.
बॉबी देओलसोबत इंटीमेट सीन
आमच्या पार्टनर वेब साइट बॉलीवूडलाइफशी बोलताना ईशा गुप्ता म्हणाली- ''कंफर्टेबल आणि अनकंफर्टेबल असे काहीही नसते, जेव्हा तुम्ही जवळपास 10 वर्षे इंडस्ट्रीत असता तेव्हा असं काही वाटण्याचा प्रश्नच नसतो. लोकांना असे वाटते की असे इंटिमेट सीन देताना कधी कधी कठीण असतं. मात्र, यामुळे जोपर्यंत तुमच्या आयुष्यात काही समस्या यामुळे उद्भवत नसेल तर काही प्रश्नच येत नाही" असे ईशा गुप्ता म्हणते. आम्ही याबद्दल खूप खुले आहोत. जर मी पहिल्यांदाच असे शूट करत असेल तर असा सीन करणे माझ्यासाठी कठीण झाले असते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कसलेल्या अभिनेत्यासोबत असा सीन करत असाल तेव्हा काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या कामात आनंदी आहात की नाही हे फक्त महत्त्वाचं आहे" असं ईशा गुप्ताचे म्हणणे आहे.
ईशा गुप्ता 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये सोनियाच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर आल्यापासून ईशा गुप्ताला या वेब सीरिजमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ही वेब सिरीज MX Player वर ३ जून रोजी रिलीज झाली आहे.
बॉबी देओल आणि ईशा गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर 'आश्रम 3' वेब सीरिजबाबत पोस्ट केली आहे. बॉबी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले- 'आश्रमाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहेत.'