IT Raid on Taapsee-Anurag: इन्कम टॅक्स विभागाने केला मोठा खुलासा

अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने दोन दिवस छापेमारी केली. त्यानंतर आता या प्रकरणात आयकर विभागाने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Taapsee Pannu
तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ 

मुंबई : इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) गेल्या दोन दिवसांत अनुराग कश्यप, तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि विकास बहल यांच्या घर, कार्यालयांवर छापेमारी केली. या छापेमारीनंतर आता इन्कम टॅक्स विभागाने एक मोठं वक्तव्य केलं आहे. इन्कम टॅक्स विभागाने म्हटलं, तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि विकास बहल यांच्या विविध कार्यालयांवर छापेमारी केल्यावर अनेक पुरावे मिळाले आहेत. त्यांचे उत्तन्न आणि खर्च यांच्यामध्ये मोठे अंतर असल्याचे समोर आले आहे. असेही काही प्रश्न विचारण्यात आले ज्यांची योग्य उत्तरे मिळू शकलेली नाहीत. तापसी पन्नू कडून पाच कोटी रुपयांची सिसीटही मिळाली आहे.

इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पैशांची हेराफेरी, प्रोडक्शन हाऊसच्या शेअर्सची देवाण-घेवाण यांचे कमी मूल्यांकन हे जवळपास ३५० कोटी रुपयांचे असल्याचं समोर आले आहे. अभिनेत्रीकडून  कोटी रुपयांची कॅश रिसीट मिळाली आहे. या व्यतिरिक्त प्रमुख निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी संबंधित २० कोटी रुपयांच्या बोगस खर्चाच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळाली आहे. 

काय म्हटलं आहे इन्कम टॅक्स विभागाने 

  1. दोन दिवसांच्या छापेमारीनंतर इन्कम टॅक्स विभागाने दिलं मोठं वक्तव्य, टॅक्स चोरीचे मिळाले पुरावे
  2. घर, कार्यालय आणि इतर २८ जागांवर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी
  3. पाच कोटी रुपयांची कॅश मिळाल्याच्या रिसीट अभिनेत्रीकडून मिळाल्या आहेत
  4. मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबादमध्ये इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी 
  5. ३५० कोटी रुपयांची कर चोरी असल्याची माहिती
  6. अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि विकास बहल यांच्या मालमत्तेवर छापेमारी 

३ आणि ४ मार्च रोजी छापेमारी

इन्कम टॅक्स विभागाकडून मुंबईतील दोन प्रमुख फिल्म प्रोडक्शन कंपन्या, एक आघाडीची अभिनेत्री आणि दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर छापेमारी करण्यात आली. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबादमध्ये इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी आणि शोधमोहीम राबवण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी