Taapsee Pannu : मुंबई: तापसी पन्नू, हिंदी सिनेसृष्टीतलं असं एक नाव, ज्या नावाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. एकाहून एक सरस चित्रपट तापसीने आजपर्यंत दिले आहेत. अगदी अल्पावधीतच तिने बॉलिवूडमध्ये स्वत: स्थान निर्माण केलं आहे. सुजित सरकार आणि तापसीचा पिंक चित्रपट आठवतोय का? या सिनेमानेच तापसीचं बॉलिवूडमध्ये करिअर घडवलं. तापसीशी गप्पा मारण्याचा योग जुळून आला, आणि काही गोष्टी तिने उलगडल्या आहेत. तापसी म्हणते, की " कोणतीही गोष्ट करण्याचा माझा हेतू माझ्या स्टार व्हॅल्यूवर आधारित नसतो, काहीतरी करण्याचा किंवा न करण्याचा माझा स्वत:चा निर्णय आहे." तापसी पुढे म्हणते की, तिला अनेकदा एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया न देण्याचा किंवा काही वादग्रस्त विषय पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. “मी (एखाद्या गोष्टीचे) उत्तर देण्यापासून परावृत्त होणार नाही कारण मला प्रामाणिकपणे वाटते की मी खोट्याविरोधात बोलते, त्याला लक्ष्य करते. पुढे ती असंही म्हणते, ''मी कधीच लोकांवर टीका करणारी किंवा लोकांना लक्ष्य करू इच्छित नाही, मग मला योग्य आणि सत्य असलेले काहीतरी टाळण्याची गरज का आहे,” ती पुढे म्हणाली.
तापसी पन्नूकडे या वर्षी अर्धा डझनहून अधिक चित्रपट आहेत. 2021 चा एन्ड तिच्या हसीन दिलरुबा आणि रश्मी रॉकेटने झाला आणि 2022 ची सुरुवात लूप लपेटाने झाली- एखादं चांगलं स्क्रिप्ट हातातून निसटून जाऊ नये यासाठी मी कधीकधी स्वत:ला ओव्हरबुकिंग करून घेते, ती म्हणाली
मात्र, मध्यवर्ती नायकाच्या भूमिकेत तिच्यासोबत अनेक चित्रपट असल्याने तिच्या विरुद्ध नायक शोधणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे! तापसीने नेहमी चांगल्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची तिची इच्छा व्यक्त केली. “जर तुम्हाला डेंजर डिस्क्रिमिनेशनची भीती वाटत असेल तर तुमच्या विचार प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे.
पुरेसा अनुभव नसतानाही काही पुरुष कलाकारांना, केवळ महिला अभिनेत्रीची भूमिका तुलनेने मजबूत असल्यामुळे किंवा काही विशिष्ट भूमिका करण्याची इच्छा नव्हती. स्त्रीप्रधान भूमिका करणं सगळ्यांनाच नाही पटत. बेबीमध्ये माझी 7 मिनिटांची भूमिका होती ज्या भूमिकेने माझं करिअर घडवलं, असं तापसी म्हणते. या चित्रपटात माझ्याकडे सर्वात छोटासा भाग होता- पण हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता, आणि नाम शबाना हा माझ्या कारकीर्दीतला महत्त्वाचा चित्रपट असल्याचंही ती म्हणते."