katrina kaif expensive gifts कतरिना कैफ-विकी कौशलला लग्नात मिळाल्या महाग भेटवस्तू

Expensive wedding gifts from friends to Katrina Kaif-Vicky Kaushal बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि बॉलिवूड अभिनेता विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये संपन्न झाला. या डेस्टिनेशन वेडिंग सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.

Expensive wedding gifts from friends to Katrina Kaif-Vicky Kaushal
कतरिना कैफ-विकी कौशलला लग्नात मिळाल्या महाग भेटवस्तू 
थोडं पण कामाचं
  • कतरिना कैफ-विकी कौशलला लग्नात मिळाल्या महाग भेटवस्तू
  • सलमान खानने कतरिनाला ३ कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार भेट म्हणून दिल्याचे वृत्त
  • रणबीर कपूरने कतरिनाला २.७ कोटी रुपयांचा हिऱ्यांचा हार भेट म्हणून दिल्याचे वृत्त

Expensive wedding gifts from friends to Katrina Kaif-Vicky Kaushal मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि बॉलिवूड अभिनेता विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये संपन्न झाला. या डेस्टिनेशन वेडिंग सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते. 

लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल या नव दांपत्याला बॉलिवूडच्या दिग्गजांनी महाग भेटवस्तू दिल्याचे वृत्त आहे. या संदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही. मात्र बॉलिवूड संदर्भातले कव्हरेज करणाऱ्या बड्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना बॉलिवूडच्या दिग्गजांनी महाग भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तूंची किंमत काही लाख रुपयांपासून काही कोटी रुपयांपर्यंत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये कतरिना कैफ-विकी कौशल यांचे लग्न शाही थाटात पार पडले. लग्नानंतर नव दांपत्याला बॉलिवूडच्या दिग्गजांनी महाग भेटवस्तू दिल्या. अभिनेता सलमान खानने कतरिनाला ३ कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार भेट म्हणून दिल्याचे वृत्त आहे. अभिनेता रणबीर कपूरने कतरिनाला २.७ कोटी रुपयांचा हिऱ्यांचा हार भेट म्हणून दिल्याचे वृत्त आहे. अभिनेत्री आलिया भट्टने नव दांपत्याला महाग अत्तरांचा सेट भेट म्हणून दिला. या अत्तरांच्या सेटची किंमत काही लाख रुपये असल्याचे वृत्त आहे.

मुंबईत विकी कौशलने लग्नानंतर राहण्यासाठी एक लक्झरी अपार्टमेंट भाड्याने घेतली आहे. या इमारतीत कतरिना-विकीचे शेजारी अनुष्का शर्मा-विराट कोहली हे आहेत. यामुळे लग्नासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला विशेष आमंत्रण होते. अनुष्काने कतरिनाला ६.४ लाख रुपयांचे हिऱ्याचे कानातले भेट म्हणून दिल्याचे वृत्त आहे. अभिनेता शाहरूख खानने नव दांपत्याला दीड लाख रुपयांचे आकर्षक चित्र भेट म्हणून दिल्याचे वृत्त आहे.

अभिनेता हृतिक रोशनने विकी कौशलला ३ लाख रुपयांची BMW G310 R सुपरबाइक भेट म्हणून दिल्याचे वृत्त आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने विकी १.४ लाख रुपयांचे प्लॅटिनमचे ब्रेसलेट म्हणून दिल्याचे वृत्त आहे. लग्नाच्या निमित्ताने विकी कौशलने कतरिना कैफला १.३ कोटी रुपयांची हिऱ्यांची अंगठी भेट म्हणून दिल्याचे वृत्त आहे. कतरिनाने विकी कौशलला मुंबईत १५ कोटी रुपयांची अपार्टमेंट भेट म्हणून दिल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी