Satish Kaushik Passes Away : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

बी टाऊन
भरत जाधव
Updated Mar 09, 2023 | 09:21 IST

Satish Kaushik Passes Away : प्रसिद्ध अभिनेते (Famous actor)आणि दिग्दर्शक (Director) सतीश कौशिक (Satish Kaushik)यांचं आज पहाटे निधन झालं.  सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  अनुपम खेर (Anupam Kher)यांनी सोशल मीडियावर (Social media) भावनिक पोस्ट लिहितं ही माहिती दिली.

famous actor and director Satish Kaushik passed away
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज पहाटे निधन झालं.
  • अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहितं ही माहिती दिली.
  • सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे जवळचे मित्र होते.

Satish Kaushik Passes Away : प्रसिद्ध अभिनेते (Famous actor)आणि दिग्दर्शक (Director) सतीश कौशिक (Satish Kaushik)यांचं आज पहाटे निधन झालं.  सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनुपम खेर (Anupam Kher)यांनी सोशल मीडियावर (Social media) भावनिक पोस्ट लिहितं ही माहिती दिली. यासोबतच त्यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राम लखनमध्ये अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची जोडी हिट होती.   ( famous actor and director Satish Kaushik passed away)

अधिक वाचा  : पांड्या वहिनींचा हॉट बीच लूक पाहून फुटेल घाम

गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला होता. त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केलं होतं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.

अधिक वाचा  :  राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी तापमानात वाढ

सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अलविदा दोस्त!

सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे जवळचे मित्र होते. सतीश कौशिकसोबतचा एक फोटो शेअर करत अनुपम खेर म्हणाले की, मला माहित आहे “मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे! पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल हे लिहील असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम!! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही! ओम शांती!

अधिक वाचा  :  संत तुकाराम बीज निमित्त HD Images


कंगनानं शेअर केलं ट्वीट

अभिनेत्री कंगना रनौतनं ट्विटरवर सतीश यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन लिहिलं, 'सकाळी उठल्यावर ही धक्कादायक बातमी कळाली. सतीश हे खूप चांगले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. आम्हाला त्यांची आठवण येईल. ओम शांती.'


दोन दिवसांपूर्वीच सतीश कौशिक यांनी आपल्या प्रियजनांसोबत होळी खेळली होती. सिने कलाकार आणि चित्रपसृष्टीतील इतर लोकांसोबत खेळलेल्या या होळीचे सर्व फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्टही केले होते. अशात अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी हा मोठा धक्का आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी