Pradeep sarkar अलविदा !, नॅशनल अवॉर्ड विनर फिल्म 'परिणीता' डायरेक्टरचे निधन

Pradeep sarkar passed away : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे. अभिनेत्री नीतू चंद्राने दिग्दर्शकाच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Famous director Pradeep Sarkar is no more
Pradeep sarkar अलविदा !, नॅशनल अवॉर्ड विनर फिल्म 'परिणीता' डायरेक्टरचे निधन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे.
  • चित्रपट निर्माते प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे.
  • प्रदीप सरकार यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Pradeep sarkar passed away : बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे.  त्यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 24 मार्च रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला. (Famous director Pradeep Sarkar is no more)

अधिक वाचा : Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार झाला जखमी

रिपोर्ट्सनुसार प्रदीप सरकार हे काही दिवसांपासून डायलिसिसवर होते. त्यांची पोटॅशियम पातळी झपाट्याने कमी झाली, त्यानंतर प्रदीप सरकार यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान चित्रपट निर्माता गमावला आहे.अभिनेत्री नीतू चंद्राने दिग्दर्शकाच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी सांगितली.

अधिक वाचा : Pooja Sawant : मराठी अभिनेत्री पूजा सावंत झाली क्वारंटाइन

प्रदीप सरकार यांनी अनेक सुपरहिट आणि अप्रतिम चित्रपट केले होते. पण सैफ अली खान आणि विद्या बालन स्टारर परिणीताला सर्वाधिक पसंती मिळाली. परिणीता हा त्यांचा चित्रपट दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. हा चित्रपट आजही चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने विद्या बालनला स्टार बनवले. परिणीता चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 5 फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले. प्रदीप सरकारच्या दिग्दर्शनाखाली बनलेला शेवटचा हिंदी चित्रपट म्हणजे हेलिकॉप्टर ईला. यात काजोलने मुख्य भूमिका साकारली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी