Amazing Painting : डोळ्यांत मीठ टाकून आणि पट्टी बांधून काढलं सोनू सूदचं पेंटिंग, कला पाहून सगळेच झाले थक्क

अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता सोनू सूदच्या एका फॅननं त्यालाही धक्का दिला आहे. डोळ्यावर मीठ ठेऊन आणि वरून काळी पट्टी बांधून त्यानं सोनूचं एक पेंटिंग साकारलं आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Amazing Painting
डोळ्यांत मीठ टाकून आणि पट्टी बांधून काढलं सोनू सूदचं पेंटिंग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डोळ्यावर मीठ ठेऊन आणि पट्टी बांधून सोनू सूदचं पेंटिंग
  • चाहत्याकडून सोनू सूदला अनोखी भेट
  • प्रत्यक्ष भेटून पेंटिंग देण्याची इच्छा

Amazing Painting : बॉलीवूड स्टार सोनू सूदला कोण ओळखत नाही? त्याच्या अभिनयामुळे त्याचे जितके चाहते आहेत, तितकेच चाहते त्याच्या सामाजिक कार्यामुळे आहेत. अनेकांना तर सोनू सूद हे नाव लॉकडाऊनच्या काळात माहित झालं. हजारो गरजूंना मदत करणारा आणि मुंबईत अडकलेल्या हजारो परप्रांतियांना स्वखर्चाने आपापल्या गावी पोहोचवणारा अभितेता अशी ओळख सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात तयार केली. त्याचप्रमाणं वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक घटनांवर बिनधास्तपणे आपली मतं नोंदवणारा अभिनेता हीदेखील त्याची ओळख आहे. सोनू सूदचे चाहते त्याच्यावर असणारं आपलं प्रेम दाखवण्यासाठी वाट्टेल ते करत असतात. सोनूचा असाच एक चाहता सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. डोळ्यावर मीठ ठेऊन आणि वरून पट्टी बांधत त्यानं सोनू सूदचं एक चित्र काढलं आहे. हे चित्र सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. 

असं साकारलं पेंटिंग

या कलाकारानं ज्या प्रकारे सोनू सूदचं चित्र काढलं, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. अगोदर त्यानं आपले डोळे बंद केले. डोळ्यावर मीठ लावलं. मग त्यावर पट्टी गुंडाळली. त्यानंतर हातात ब्रश घेऊन त्यानं कॅनव्हासवर आपल्या आवडत्या अभिनेत्याचं चित्र साकारलं. विकास गुप्ता नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर कऱण्यात आला आहे. 

आधिक वाचा- थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय”, ‘दे धक्का २’मध्ये नव्या अभिनेत्रीची एण्ट्री

व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हा व्हिडिओ पाहून कुणीही थक्क होईल, असं विकास गुप्ता यांनी म्हटलं आहे. ते लिहितात, “बिहारमधील सिवानमध्ये राहणारे अजमेर आलम यांनी मसीहा सोनू सूद यांचं अद्भूत पेंटिंग साकारलं आहे. त्याचंं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सोनू सूद यांना भेटून हे पेंटिंग सादर करण्याची अजमेर यांची इच्छा आहे.”

आधिक वाचा- Mirzapur 3 shooting will start soon : मिर्झापूर सीझन 3 चे शूटिंग पुढील आठवड्यात सुरू होणार, कालिन भैया म्हणाले - मी पुन्हा एकदा एक्साईटेड आहे

डाय हार्ट फॅन्स

केवळ अभिनयच नव्हे तर सामाजिक कार्यामुळे आपण सोनू सूदचे फॅन आहोत, असं अजमेर सांगतो. त्यामुळेच त्यानं एवढी रिस्क घेऊन आपल्या आवडत्या कलाकाराचं पेंटिंग तयार केल्याचं सांगितलं जात आहे. अगोदर त्याने स्वतःच स्वतःच्या डोळ्यावर मीठ चोळलं. त्यानंतर एक व्यक्ती अजमेरच्या डोळ्यावर पट्टी बांधताना दिसते. त्यानंतर प्रेक्षकांसमोर लाईव्ह जात अजमेरनं पेंटिंग काढायला सुरुवात केली. डोळे बंद असताना अजमेर कसं काय चित्र काढणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र काही क्षणांतच कॅनव्हासवर कमाल होत असल्याचं सर्वांना दिसलं. पुढच्या काही मिनिटांत सोनू सूदचा चेहरा कॅनव्हासवर अवतरला आणि पाहणारे सगळेच थक्क झाले. त्यानंतर अजमेरनं आपल्या डोळ्यावरची काळी पट्टी सोडली आणि नंतर मीठ धुऊन टाकलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी