Swayamvar- Mika Di Vohti: फराह खानला लग्नाच्या पहिल्याच वर्षी जायचं होतं पळून; स्वतः हून केला खुलासा

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jul 05, 2022 | 15:00 IST

Swayamvar- Mika Di Vohti: 20 जून रोजी टीव्ही शो स्वयंवर मीका दी वोटी याला सुरूवात झाली आहे. आता कोरियोग्राफर आणि फिल्ममेकर फराह खान देखील लवकरच शोमध्ये येणार आहे.

Farah Khan
फराह खान 
थोडं पण कामाचं
  • 20 जून रोजी टीव्ही शो स्वयंवर मीका दी वोटी याला सुरूवात झाली आहे.
  • या शोमधून गायक मिका सिंग आपली लाईफ पार्टनर निवडणार आहे.
  • शोमध्ये दिसलेल्या मुलींना मिकाच्या मनात आपली जागा बनवायची आहे.


मुंबई: 20 जून रोजी टीव्ही शो स्वयंवर मीका दी वोटी याला सुरूवात झाली आहे. या शोमधून गायक मिका सिंग आपली लाईफ पार्टनर निवडणार आहे. सध्या हा शो  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये स्पर्धकांमध्ये वादविवाद पाहायला मिळत आहे. शोमध्ये दिसलेल्या मुलींना मिकाच्या मनात आपली जागा बनवायची आहे आणि त्यासाठी त्या काहीही करायला तयार असतात. 

फराह खान दिसली या शोमध्ये 

शोमध्ये आलेल्या स्पर्धक मुलींची टेस्ट घेण्यासाठी, मिकाला लग्नाच्या संबंधित काही खास टिप्स देण्यासाठी तसंच मुलगी निवडण्यात मदत करण्यासाठी आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आले आहेत. आता कोरियोग्राफर आणि फिल्ममेकर फराह खान देखील लवकरच शोमध्ये येणार आहे. 

फराह खाननं सांगितला आपल्या लग्नाचा अनुभव 

शोमध्ये आलेली फराह खान मिकाला 'भाई' म्हणताना दिसेल. मिका खूप संवेदनशील आहे असंही ती या शोमध्ये म्हणताना दिसत आहे. पुढे फराह म्हणते, 'मिका खूप संवेदनशील व्यक्ती आहे आणि फक्त एक स्थिर मुलगीच त्याला हाताळू शकते. मला वाटतं लग्न करण्यासाठी कोणतंही स्टॅडर्ड वय नसतं. जेव्हा तुम्हाला योग्य व्यक्ती सापडेल तेव्हा तुम्ही लग्न केले पाहिजे. फराह तिच्या लग्नाच्या अनुभवाविषयी बोलताना म्हणाली की, लग्नाच्या पहिल्याच वर्षी मला पळून जावंसं वाटतं होतं कारण ते जुळवून घेणं खूप अवघड असतं. 

तीन मुलांची आई आहे फराह खान 

फराह खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने 09 डिसेंबर 2004 रोजी शिरीष कुंदरशी लग्न केलं. शिरीष 'मैं हूँ ना' या सिनेमाचा ए़डिर आहेत. याशिवाय दोघांनी जान-ए-मन, ओम शांती ओम आणि तीस मार खानसह अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलं आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले आहेत. या तिन्ही मुलांचा जन्म एकत्र झाला होता. 

अधिक वाचा- नीता आणि मुकेश अंबानी यांची सुंदर Lovestory

मिकाला कशी हवी आहे आपली जोडीदार

मिकाच्या शोबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मुली गायकाची पत्नी बनण्याचे स्वप्न घेऊन या शोमध्ये आल्या आहेत. मिकानं स्वयंवरापूर्वी आपली निवडही सांगितली होती. गिन्नी चतरथ (कपिल शर्माची पत्नी) आणि राधिका (शानची पत्नी) यांच्यात असलेले सर्व गुण मला त्याच्या पत्नीमध्ये हवे आहेत, असे तो म्हणाला होता. मिकाने सांगितले होतं की, मुली माझी पत्नी आणि लाइफ पार्टनर म्हणून शोमध्ये येत आहेत, पण मला कोणत्या प्रकारची मुलगी आवडते ते मी तुम्हाला सांगत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी