Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding: एप्रिलमध्ये फरहान-शिबानी करणार बॉलिवूड स्टाइल लग्न? असा असेल शाहीसोहळा

बी टाऊन
Updated Jan 30, 2022 | 17:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding: बॉलिवूड कपल फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघेही फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज करणार आहेत.

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding
फरहान आणि शिबानी एप्रिलमध्ये लग्न करणार?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार
  • फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज करणार असल्याची बी-टाऊनमध्ये चर्चा आहे
  • बॉलिवूड स्टाईलने होणार लग्न

Farhan-Shibani Wedding: बॉलिवूड कपल फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर  (Shibani Dandekar) यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हे कपल पुढच्या महिन्यात कोर्ट मॅरेज करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, फरहान आणि शिबानी २१ फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. मात्र, अद्याप दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता फरहान आणि शिबानीने कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता परिस्थिती सुधारत असल्याने फरहान आणि शिबानीचा प्लॅन बदलला आहे. रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी आता बॉलीवूड स्टाईलमध्ये लग्न करणार आहेत.

बॉलीवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केल्यानंतर एप्रिलमध्ये ग्रँड वेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे हे जोडपे कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करणार होते. परंतु आता गोष्टी नियंत्रणात आल्याने दोघांनीही प्रोटोकॉल पाळून भव्य लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानीने लग्नासाठी डिझायनर सब्यसाचा लेहंगा घालण्याचा विचार केला आहे. मात्र, या दोघांनाही सध्या त्यांच्या लग्नातल्या पोशाखाबद्दल कोणालाही कळू द्यायचे नाही. 

फरहान आणि शिबानी अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.2018 मध्ये या दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. फरहान शिबानीसोबत दुसरे लग्न करणार आहे. त्याने पहिले लग्न अधुनाशी केले. त्याला दोन मुलीही आहेत.

फरहान अख्तर शेवटचा तुफान चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि परेश रावल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी