Father’s Day: कपिल शर्मा वडिलांच्या मृत्यूसाठी करायचा प्रार्थना, जाणून घ्या का ते?

बी टाऊन
Updated Jun 16, 2019 | 20:10 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Father’s Day: आजपर्यंत कधीही कपिल शर्मानं आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला नाही. आज फादर्स डे निमित्त पहिल्यांदा कपिलनं सोशल मीडियावर आपल्या वडिलांचा फोटो पोस्ट केलाय. कपिलच्या वडिलांचं पूर्वीच निधन झालंय.

Kapil Sharma
कपिल शर्मानं पहिल्यांदा शेअर केला वडिलांचा फोटो  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: आज १६ जून रोजी ‘फादर्स डे’ साजरा केला जातोय. बॉलिवूडपासून टिव्ही सेलिब्रेटींपर्यंत सर्वच कलाकार आपआपल्या वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आज पहिल्यांदा कपिल शर्मानंही आपल्या वडिलांचा फोटो शेअर केलाय. कपिलचे वडील हे पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांचं निधन झालंय.

कपिल शर्मानं त्याचे वडील जितेंद्र शर्मा यांचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘तुम्ही नेहमी माझ्या हृदयात राहाल. लव्ह यू डॅड’. कपिल शर्मानं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, तो खूप कमी काळ आपल्या वडिलांसोबत राहिलाय.

कपिल शर्माच्या वडिलांना कँसर होता, त्यातच त्यांचं निधन झालं. जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा कपिल शाळेत शिकत होता. त्याचे वडील पंजाब पोलीस हेड कॉन्स्टेबल होते. तर त्यांची आई हाऊसवाईफ होती. कपिल शर्मानं सांगितलं की, त्यानं दहावीनंतर आपल्या पॉकेट मनीसाठी पीसीओमध्ये काम केलंय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You are always in my heart love u Dad

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

वडिलांच्या मृत्यूसाठी देवाकडे करत होता प्रार्थना

कपिल शर्मा म्हणतो, मी एक असा मुलगा आहे, जो आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी प्रार्थना करत होता. कॅन्सरमुळे जेव्हा त्याचे वडील एम्समध्ये उपचार घेत होते, तेव्हा तो त्यांच्यासोबत असायचा. वडिलांना होणारा त्रास बघणं खूप वेदनादायक होतं, तेव्हा ‘देवा तू यांना आपल्याकडे बोलावून घे’, अशी प्रार्थना करायचो, असंही कपिलनं सांगितलं.

कपिल शर्मा म्हणतो मी वडिलांवर खूप चिडायचो, ओरडायचो. मी वडिलांना म्हणत असे, ‘पापा, तुम्ही कधीच आपल्या शिवाय दुसऱ्या कुणाचा विचार केला नाही, म्हणून तुम्हाला कॅन्सर झाला.’

 

 

वडिलांना कॅन्सर झाल्याचं कळताच खूप रडला कपिल

कपिल शर्मानं सांगितलं की, ‘जेव्हा मला माहिती झालं वडिलांना कॅन्सर झालाय तेव्हा मी खूप रडलो होतो. कपिल म्हणतो, मी वडिलांसमोर आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हतो, कारण ते पोलीस होते. त्यामुळे मला त्यांची नेहमी भिती वाटत होती.’

 

 

मी जेव्हा मोठा झालो, तेव्हा मला कळलं की माझे वडील किती गोड होते. ते काही भितीदायक नव्हेत. कपिलनं सांगितलं की, ते महिन्यातून दोन वेळा ड्रिंक करायचे आणि चिकन खायचे. जर ते आज जिवंत असते तर मी त्यांना एक चांगल्या दर्जाची स्कॉच गिफ्ट केली असती.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Father’s Day: कपिल शर्मा वडिलांच्या मृत्यूसाठी करायचा प्रार्थना, जाणून घ्या का ते? Description: Father’s Day: आजपर्यंत कधीही कपिल शर्मानं आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला नाही. आज फादर्स डे निमित्त पहिल्यांदा कपिलनं सोशल मीडियावर आपल्या वडिलांचा फोटो पोस्ट केलाय. कपिलच्या वडिलांचं पूर्वीच निधन झालंय.
Loading...
Loading...
Loading...