लहानपणापासूनच वडिलांच्या खूप जवळ आहे सारा अली खान, फादर्स डे निमित्त लिहिली ही भावूक पोस्ट

बी टाऊन
Updated Jun 16, 2019 | 18:53 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

फादर्स डेच्या निमित्ताने सारा अली खानने लहानपणाचे काही फोटोज शेअर केले आहेत. यात सारा वडील सैफ अली खानला किस करताना दिसत आहे तर कधी त्याच्या पाठीवर बसून मस्ती करताना दिसत आहे.

sara ali khan and saif ali khan
सारा अली खान आणि सैफ अली खान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: जगभरात आज १६ जूनला फादर्स डे साजरा केला जातो. यातच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियाद्वारे फादर्स डे साजरा केला आहे. सारा अली खानने आपले वडील सैफ अली खानसोबतचे फोटो या निमित्ताने शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. सारा अली खानने इन्स्टाग्रामवर आपल्या लहानपणीचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये साराची सैफ अली खानसोबत केमिस्ट्री दिसत आहे. 

सारा अली खान फोटोमध्ये वडिलांना किस करताना दिसत आहे तर एका फोटोमध्ये ती सैफच्या पाठीवर बसून मस्ती करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर एका फोटोमध्ये सारा आणि सैफ आमने-सामने बसून एकमेकांना बोटे दाखवताना दिसत आहे. या अनसीन फोटोजमध्ये एक फोटो असाही आहे ज्यात लहानही सारा अली खान आपल्या बांगड्या दाखवत आहे. यात तिने आपल्या कपाळावर मोठी बिंदीही लावली आहे. यासोबतच सैफ अली खान सर्व फोटोंमध्ये शर्टलेस दिसत आहे. 

फोटोच्या कॅप्शनमध्ये सारा अली खानने लिहिले, हॅपी फादर्स डे अब्बा...! थँक्यू नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी माझ्या हॉलिडेमध्ये पार्टनर बनण्यासाठी, कसे शिकावे हे मला शिकवण्यासाठी...! मला माझ्या आयुष्यातील पहिला पाऊस आणि बर्फ दाखवण्यासाठी मला स्पेगेटी कशी खातात हे शिकवण्यासाठी थँक्यू. प्रत्येक परिस्थितीत नेहमी पेशन्स, लव्हिंग आणि दयाळू राहण्यासाठी थँक्स...सारा अली खान आपले वडील सैफ अली खानच्या खूप जवळ आहे. दोघेही कॉफी विथ करणमध्ये एकत्र आले होते. या दरम्यान दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री दिसली होती. 

सारा अली खानने केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. यात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. यानंतर साराने सिम्बा या सिनेमात रणवीर सिंहसोबत काम केले होते. आता सारा इम्तियाज अलीच्या सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन आणि रणदीप हुडाही असणार आहे. असं सांगितलं जात आहे की हा सिनेमा २००९मध्ये आलेल्या लव्ह आज कल या सिनेमाचा सिक्वेल असणार आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारी २०२०मध्ये रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
लहानपणापासूनच वडिलांच्या खूप जवळ आहे सारा अली खान, फादर्स डे निमित्त लिहिली ही भावूक पोस्ट Description: फादर्स डेच्या निमित्ताने सारा अली खानने लहानपणाचे काही फोटोज शेअर केले आहेत. यात सारा वडील सैफ अली खानला किस करताना दिसत आहे तर कधी त्याच्या पाठीवर बसून मस्ती करताना दिसत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles