Salman Khan and Danny Denzongapa : 75 वर्षांच्या डॅनी डेन्झोग्पा यांनी हिंदीच नाही तर बंगाली, नेपाळी आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. स्वत:ची वेगळी शैली आणि आपल्या वेगळ्या लूकने डॅनीने आपला एक चाहता वर्ग तयार केला आहे. डॅनी जवळपास 4 दशकांपासून इंडस्ट्रीत आहे. तो नुकताच 'उंचाई' या चित्रपटात दिसला होता. डॅनीने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. अभिनेता डॅनीने आपल्या जीवनात काही नियम ठेवली आहेत, त्या नियमातच डॅनी आपले जीवन जगत आहेत. याच नियमामुळे डॅनीने बॉलिवूडचा भाईजान दबंग खानला साईड लाईन केलं होतं. त्याचं असं डॅनीने सलमान सलमान खान राग आला होता, या रागामुळे डॅनीने तब्बल 23 वर्ष सलमान खान सोबत काम करण्यास नकार दिला होता.
डॅनी डेन्झोग्पा यांनी 1991 मध्ये आलेल्या 'सनम बेवफा' चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. सावन कुमार टाकच्या या चित्रपटातून चांदनी नावाच्या अभिनेत्रीने पदार्पण केले. या चित्रपटातील गाणी खूप सुपरहिट झाली होती. प्रचंड गाजलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि डॅनी यांच्यात खडाजंगी झाली होती.
अधिक वाचा :कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक करीना-सैफचा धाकटा नवाब जेह
वास्तविक, 'मैने प्यार किया' चित्रपटाच्या यशाने सलमान खानला रातोरात स्टार बनवले. पहिल्या चित्रपटाच्या यशाने सलमान खूपच उत्साहित झाला होता. भाग्यश्रीने 'मैने प्यार किया' या चित्रपटातून पदार्पण केले, तर चांदनीने 'सनम बेवफा'मधून पदार्पण केले. या चित्रपटात सलमानसोबत डॅनी डेन्झोग्पा आणि पुनीत इस्सारसारखे दिग्गज कलाकार होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सनम बेवफा' चित्रपटात अभिनेता सलमान खान थोडा अहंकारी होता. डॅनीच्या मुलाच्या भूमिकेत सलमान एके दिवशी शूटिंग सेटवर वेळेवर पोहोचला नाही. सलमान खूप उशिरा पोहोचल्याने वाट पाहत बसलेले ज्येष्ठ अभिनेते डॅनी यांचा संयम सुटला. सलमान खान समोर येताच त्यांनी त्याला फटकारले. तसेच सर्वांसमोर त्याला शिस्तीचा धडा शिकवला.
अधिक वाचा :शाहरुख खानच्या मॅनेजरची कमाई पाहून व्हाल थक्क
सलमानने आपली चूक मान्य करण्याऐवजी डॅनीशी वाद घालण्यास सुरुवात केली. सलमानच्या या कृतीचा डॅनीला राग आला आणि त्याने शपथ घेतली, की तो सलमानसोबत पुन्हा कधीही चित्रपट करणार नाही. दोघेही एक-दोन नव्हे तर तब्बल 23 वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसलेले नाहीत.