हार्दिक पांड्याच्या होणाऱ्या बायकोने शेअर केला ग्लॅमरस फोटो  

हार्दिक पांड्याची होणारी पत्नी नताशाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर हार्दिक पांड्याने देखील कमेंट केली आहे

fiance natasa stankovic shared a glamorous photo with hardik pandya
हार्दिक पांड्याच्या होणाऱ्या बायकोने शेअर केला ग्लॅमरस फोटो    |  फोटो सौजन्य: Instagram

दुबई: टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटर हार्दिक पांड्याने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याने सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टेनकोविक हिच्याशी साखरपुडा केला होता. या बातमीमुळे त्याचे चाहते देखील बुचकळ्यात पडले होते. दोघांनी दुबईमध्ये एका स्पीडबोटवर साखरपुडा केला होता. ज्याचा व्हिडिओ आणि फोटो देखील त्यांनी शेअर केले होते. 

साखरपुडा झाल्यापासून दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकतंच नताशाने हार्दिकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही बीच साइडवर उभे असल्याचं दिसत आहेत. या फोटोमध्ये नताशाने मोनोकिनी घातल्याचं दिसून येत आहे. यासोबतच तिने आपले केसही मोकळे सोडले आहेत. तर दुसरीकडे हार्दिक शॉर्ट्स घातलेला पाहायला मिळतोय. यावेळी दोघांनीही डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल चढवला आहे. या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांच्या कमरेभोवती आपले हात ठेवले आहेत. नताशाने हा फोटो शेअर केल्यानंतर हार्दिकने कमेंटमध्ये हार्टची इमोजी टाकली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

२०२० च्या पहिल्याच दिवशी हार्दिक आणि नताशाने स्पीडबोटवर साखरपुडा केल होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन त्यांनी आपल्या चाहत्यांना धक्का दिला होता. यावेळी हार्दिकचे मित्र किंवा चाहतेच नव्हे तर कुटुंबीय देखील यामुळे अवाक् झाले होते. कारण की, या साखरपुड्याबाबत त्यांना देखील काहीही माहिती नव्हती. याबाबत हार्दिकच्या वडिलांनी सांगितलं की, 'नताशा चांगली मुलगी आहे. आम्ही मुंबईत तिला अनेकदा भेटलो आहोत. आम्हाला माहिती होतं की, हार्दिक आणि नताशा दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जात आहे. पण साखरपुड्याबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हतं. आम्हाला देखील सर्वांप्रमाणेच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या साखरपुड्यानंतरच आम्हाला देखील त्याची माहिती मिळाली.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Forever yes ??❤️ @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

नताशा ही सिंगर बादशाहच्या प्रसिद्ध 'डीजे वाला बाबू' या गाण्यात दिसली होती. त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली होती. नताशाने २०१३ साली प्रकाश झा यांच्या सत्याग्रह यांच्या सिनेमात एक आयटम साँग देखील केलं होतं. याशिवाय नताशा शेवटची इम्रान हाश्मी आणि ऋषी कपूर यांच्या 'द बॉडी' या सिनेमात दिसली होती. याबरोबरच ती नच बलिएमध्ये देखील सहभागी झाली होती. तसंच बिग बॉस ८व्या सीजनमध्ये देखील ती स्पर्धक होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी