Santosh Juvekar and Manj Vajpayee : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी वेबसीरिजचा आघाडीचा कलाकार आहे. फॅमिली मॅन ही मनोज बाजपेयीची गाजलेली वेबसीरिज आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनप्रमाणेच दुसरा सीझनही चांगलाच गाजला होता. हे दोन्ही सीझन जबरदस्त हिट ठरले आहेत. त्यांना खूप प्रेम मिळाले. Amazon Prime Video ची ही टॉप वेब सिरीज आहे.
याआधी मनोज बाजपेयी यांनी बॉलिवूडमध्येही बँडीट क्वीन, सत्या, शूलमधील त्याच्या कामाचंही खूप कौतुक झालं होतं. प्रकाश झा यांचा राजनीती या सिनेमात त्यांनी साकारलेला राजकारणी सगळ्यांचीच वाहवा मिळवून गेला. तर दुसरीकडे संतोष जुवेकर हा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता. संतोष जुवेकरनेही झेंडा, मोरया, रेगे अशा अनेक सिनेमांमध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. हिंदी आणि मराठीतील या दोन आघाडीच्या अभिनेत्यांनी भोसले या हिंदी सिनेमात एकत्र काम केले आहे. मराठी माणूस आणि हिंदी भाषिक यांच्यात झालेल्या वादावर या सिनेमाची कथा आधारित होती.
अधिक वाचा : राज्यात पावसाचं थैमान; आतापर्यंत ७६ जणांचा बळी
सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये हाणामारी झालेली दिसत आहे. खुद्द संतोष जुवेकरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मात्र नेमकं काय झालं आहे हे अद्याप कळलेलं नाही. हे दोघं कुठल्या तरी आगामी सिनेमातील किंवा वेबसीरिजमधील सीनची तयारी करत असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संतोषने हा व्हिडिओ पोस्ट करताच त्याच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सही दिल्या आहेत.
संतोष जुवेकर यानेही अनेक वेबसीरीजमध्ये काम केले आहे. मनोज बाजपेयी आणि संतोषने भोसले या चित्रपटात काम केले आहे. दोघांमध्ये हाणामारी झाली आहे, त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. खुद्द संतोषने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. परंतु नेमंक काय झाले हे अद्याप कळालेले नाही. दोघेही कुठल्या तरी सीनची तयारी करत असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.
हाणामारीचा हा व्हिडिओ शेअर करत संतोष जुवेकरने लिहिले आहे, "माझं आणि मनोज Manoj Bajpayee चं भांडण अक्षरशः हाणामारी पर्यंत आलं. आणि पुढे जे घडलं ते सांगतो तुम्हाला.पुरावा म्हणुन हा video post करतोय."
अधिक वाचा : लग्नाच्या बोहल्यावरच नवरदेवाशी केला लेखी करार
काही दिवसांपूर्वीच संतोषने आपलं एक स्वप्न पूर्ण झाल्याचंही सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. त्यात त्याने म्हटले होते. 'मित्रांनो एक स्वप्नं पूर्ण होत आहे...' त्यानं पोस्टमध्ये पुढं लिहिलं आहे की, 'ठाण्यात एक फिल्म स्कूल असावं जिथे सामान्य घरातल्या मुलांना,मुलींना ज्यांना या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे. त्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि अॅडमिशन फी सुद्धा परवडणारी असावी. त्यांना उत्तम ट्रेनिंगही मिळावं. आणि ई दृश्यम फिल्म अँड इंटरटनेमेंट स्कूल (E-Drishyam film and Entertainment school) च्या रूपात ते स्वप्न तुम्हां सर्वांच्या शुभेच्छांनी आणि बाप्पाच्या आशिर्वादानं पूर्ण झालं. आता त्याला एनएसडीसी (National skill Development council)गर्व्हमेंट रेकनाईज्ड ट्रेनिंग पार्टनरशिप
(Goverment Recognized Training partnership) आणि एमईएससी (Media & Entertainment Skill Council) मान्यता मिळाली आहे.'