Complaint Filed Against Leena Manimekalai: 'काली' सिनेमाच्या पोस्टरवरून वाद चिघळला, चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाईं विरोधात तक्रार दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

बी टाऊन
Updated Jul 04, 2022 | 19:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Complaint Filed Against Leena Manimekalai: लीना मणिमेकलाई यांच्या काली या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. माहितीपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर लोक चित्रपट निर्मातीच्या अटकेची मागणी करत होते. आता बातमी आली आहे की लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Filed a complaint against the makers of Kali cinema, accused of hurting religious sentiments
काली सिनेमाच्या पोस्टवरून वाद चिघळला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काली चित्रपटाच्या पोस्टरने खळबळ उडवून दिली.
  • चित्रपट निर्मातीला अटक करण्याची मागणी होत असल्याचे सांगण्यात येत होते
  • लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात तक्रार दाखल.

Complaint Filed Against Film Kaali Maker Leena Manimekalai: भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी 2 जुलै रोजी त्यांच्या काली चित्रपटाचे डॉक्युमेंटरी पोस्टर रिलीज केले, ज्यानंतर लोक चित्रपट निर्मातीला अटक करण्याची मागणी करत होते. लीना मणिमेकलाईने हे वादग्रस्त डॉक्युमेंटरी पोस्टर रिलीज करताच सोशल मीडियावर लोक तिला ट्रोल करत होते आणि तिच्या अटकेची मागणी करत होते. वादग्रस्त पोस्टरवरून झालेल्या गदारोळानंतर आता लीना मणिमेकलाई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.


दिल्लीस्थित एका वकिलाने २ जुलै रोजी चित्रपट निर्मातीने शेअर केलेल्या लीना मनिमेकलाईच्या वादग्रस्त पोस्टरबाबत तक्रार दाखल केली आहे. रिपोर्ट्सनुसार, वकिलाने या आक्षेपार्ह फोटोवर बंदी घालण्याची आणि डॉक्युमेंट्रीमधून ही क्लिप काढून टाकण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ज्या पोस्टरमध्ये देवी कालीच्या वेषात एक महिला सिगारेट ओढताना दिसत आहे ते हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावणारे आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली असून त्यात असे लिहिले आहे की, 
'हे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोंद्वारे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने विचारपूर्वक केलेले आणि दुर्दैवी कृत्य आहे. आरोपीने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केले, शेअर केले आणि सोशल मीडिया आणि सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले गेले.


त्याशिवाय, 'हा 295A, 298, 505, 67 IT कायदा आणि 34 IPC अन्वये गुन्हा असून आरोपीवर दंडात्मक कारवाई करावी', असे तक्रारीत लिहिले आहे. या गोंधळात बीबीसी तमिळशी बोलताना लीना म्हणाली, "माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत न घाबरता बोलणाऱ्या आवाजासोबत मला राहायचे आहे. आणि त्यासाठी जर माझ्या जीवाची किंमत असेन तर मी तोसुद्धा देईन"

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी