Love Aaj Kal: कार्तिक-साराच्या किसिंग सीनवर सेंसॉर बोर्डाची कात्री, 'लव आज कल'ला U/A सर्टिफिकेट

बी टाऊन
Updated Feb 12, 2020 | 17:11 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Censor certificate for Love Aaj Kal: अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘लव आज कल’मधून सेंसॉर बोर्डानं काही बोल्ड आणि किसिंग सीन्स हटवले आहेत. जाणून घ्या सेंसॉर बोर्डानं कुठे लावली कात्री.

Censor certificate for Love Aaj Kal
कार्तिक-साराच्या किसिंग सीनवर सेंसॉर बोर्डाची कात्री  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • लव आज कल चित्रपटाला मिळालं सेंसॉर बोर्डाचं सर्टिफिकेट, चित्रपटातील अनेक सीन्सला कात्री
  • चित्रपटातील अनेक बोल्ड सीन्स आणि ऑडियो सेंसॉर बोर्डानं हटवला
  • १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला रिलीज होईल चित्रपट

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन दोघंही आपला आगामी चित्रपट ‘लव आज कल’मुळे चर्चेत आहेत. सध्या दोघंही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत आणि प्रमोशन करण्यात ते कुठेही कमी पडत नाहीयेत. या दरम्यान कार्तिक-साराची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळतेय. चित्रपटाच्या नावावरूनच हा एक रोमँटिक चित्रपट असल्याचं समजतं. ‘लव आज कल’ या चित्रपटाला नुकतंच सेंसॉर बोर्डाचं सर्टिफिकेट मिळालं आहे. मात्र हे सर्टिफिकेट मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये बोर्डाच्या मेंबर्सनी चित्रपटातील काही सीन्सवर कात्री लावलीय. अनेक सिन्स फायनल कटमधून सेंसॉर बोर्डानं हटवायला सांगितले आहेत. यात काही किसिंग सीन्स आणि इंटिमेट सीन्सचा समावेश आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dil Mein Jo Aaye Aaj Ho Jaye Aaj Stage Laga Hai Badi Jagah Hai #DoItWithATwist #LoveAajKal #ZoeWithVeer #ZoeMeetsRaghu

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘लव आज कल’ चित्रपटाची सुरूवातच एका किसिंग सीननं झाली होती, जो सीन आता हटवला गेला आहे. याशिवाय सारा आणि कार्तिकच्या काही इंटिमेट सीन्सवर पण सेंसॉर बोर्डानं कात्री लावली आहे. यासोबतच चित्रपट निर्मात्यांना आणखी एक लवमेकिंग सीन बदलण्यास सांगितलं गेलं आहे आणि या सीनमध्ये काही गोष्टी ब्लर करण्याचे आदेशही दिले गेले आहेत.

 

 

चित्रपटात बराचसा ऑडिओ सुद्धा सेंसर केला गेला आहे. बोर्डानं मेकर्सना काही डायलॉग्स आणि शब्द बदलवायला सांगितलं आहे. यासर्व बदलांनंतरच ‘लव आज कल’ला U/A सर्टिफिकेट दिला गेला आहे. चित्रपटात सारा-कार्तिक सोबतच रणदीप हुड्डा आणि आरुषी शर्मा यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत.

या चित्रपटात दोन वेगवेगळ्या काळातील लव्ह-स्टोरीज दाखवल्या गेल्या आहेत. एकामध्ये कार्तिक आणि सारा रोमांस करतील, तर दुसऱ्या स्टोरीमध्ये कार्तिकसोबत आरुषी शर्मा दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२० ला म्हणजेज ‘व्हॅलेंटाईन डे’ला रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी