‘मिशन मंगल’ चित्रपटाचा टीझर रिलीज, अक्षय सोबत मंगळ अभियानाचा इतिहास मोठ्या पडद्यावर

बी टाऊन
Updated Jul 09, 2019 | 15:04 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

अभिनेता अक्षय कुमार नेहमीच देशावर आधारित चित्रपट बनवत असतो. अक्षयचा आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’चा टीझर रिलीज झालाय. भारतीय संशोधकांच्या मंगळ अभियानावर आधारित हा चित्रपट आहे. पाहा स्पेशल ‘मिशन मंगल’…

Akshay Kumar
'मिशन मंगल' चित्रपटाचा टिझर रिलीज 

थोडं पण कामाचं

  • मंगळ अभियानावर आधारित चित्रपट 'मिशन मंगल'चा टीझर रिलीज
  • अक्षय कुमार सोबत मोठी स्टार कास्ट चित्रपटात
  • १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज होणार चित्रपट

मुंबई: अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’चा टीझर रिलीज झालाय. यात अक्षय कुमारपासून तर विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा सर्व कलाकार आपल्याला टिझरमध्ये दिसून येत आहेत. हा टिझर अक्षयनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. टिझर शेअर करत अक्षयनं लिहिलं, ‘एक देश, एक स्वप्न, एक इतिहास’. हा चित्रपट म्हणजे भारताच्या मंगळ अभियानावर आधारित सत्य घटना आहे.

टीझरमध्ये आपण पाहू शकतो की, कशाप्रकारे एक रॉकेट स्पेसमध्ये पाठवलं जातंय. यासाठी संशोधकांची संपूर्ण टीम कसं काम करतेय. टीझरच्या सुरूवातीलाच आपल्याला सॅटेलाईटची झलक पाहायला मिळतेय. यानंतर सॅटेलाईन लॉन्च करतांना दाखवलं गेलंय. हे दृश्य आपल्या अंगावर काटा उभा करतं. चित्रपटातील संपूर्ण टीम टिझरमध्ये एक-एक करून दाखवली गेलीय. टिझरच्या अखेरीस लिहून येतंय, ‘आकाशाची सीमा नाहीय.’

यापूर्वी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं, ज्यात सॅटेलाईटसोबत चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट दाखवली गेली होती. पोस्टर शेअर करत अक्षय कुमारनं लिहिलं होतं, ‘अशा अंडरडॉग्जची कथा, जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. शक्ती, साहस, आणि कधीही हार न मानणाऱ्यांची कथा. मिशन मंगल, मंगळ ग्रहावर भारताच्या अंतराळ अभियानाची सत्य घटना. १५ ऑगस्ट २०१९ ला आपल्यासाठी येतेय.’

 

 

 

 

अक्षयनं आपल्या मुलीसाठी बनवला हा चित्रपट

मिशन मंगल हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला रिलीज होतोय. ‘मिशन मंगल’बद्दल माहिती देत अक्षयनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितलं की, हा चित्रपट त्यानं खास आपल्या मुलीसाठी बनवला आहे. अक्षयनं सोशल मीडियावर लिहिलं, ‘मिशन मंगल चित्रपट, मला आशा आहे की हा चित्रपट जेवढं आपलं मनोरंजन करेल तेवढीच आपल्याला प्रेरणा देईल. हा चित्रपट मी खास करून आपल्या मुलीसाठी आणि तिच्या वयाच्या मुलांसाठी बनवला आहे. त्यांना आपल्या भारत देशाच्या महान मंगळ अभियानाच्या सत्य घटनेबाबत माहिती मिळू शकेल.’

 

 

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर अक्षय कुमार चित्रपट ‘सूर्यवंशी’मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ सोबत दिसणार आहे. याशिवाय अक्षय ‘गुड न्यूज’ या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूरसोबत दिसेल. सोबतच अक्षय कुमार लक्ष्मी बम आणि हाऊसफुल्ल-४ चित्रपटात सुद्धा काम करतांना दिसणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘मिशन मंगल’ चित्रपटाचा टीझर रिलीज, अक्षय सोबत मंगळ अभियानाचा इतिहास मोठ्या पडद्यावर Description: अभिनेता अक्षय कुमार नेहमीच देशावर आधारित चित्रपट बनवत असतो. अक्षयचा आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’चा टीझर रिलीज झालाय. भारतीय संशोधकांच्या मंगळ अभियानावर आधारित हा चित्रपट आहे. पाहा स्पेशल ‘मिशन मंगल’…
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles