Katrina kaif and Vicky kaushal got marry: अखेर बॉलीवूडच्या सर्वात लाडक्या कपलचं अर्थातच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न झाले. सात फेरे घेऊन दोघांनी साताजन्माची गाठ बांधली. शोबिझच्या झगमगाटापासून दूर राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील
सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. वर्षातील सर्वात मोठ्या लग्नाला उपस्थित राहण्याची संधी फक्त काही पाहुण्यांनाच मिळाली. नवविवाहित जोडपे विकी-कतरिना यांच्या लग्नानंतर त्यांचे कुटुंब आनंदात मग्न झाले आहे. कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आपल्या लग्नाची ही बातमी दिली आहे. कतरिनाने आपल्या इन्स्टापोस्टवर म्हटल आहे की, ''आम्हाला या क्षणापर्यंत आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल, माणसाबद्दल आमच्या मनात फक्त आणि फक्त प्रेम आणि कृतज्ञतेची भावना आहे. आमच्या नवीन आयुष्याला, नवीन प्रवासाला आता सुरूवात करत आहोत, तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत'
आता बॉलिवूडमधील विवाहित जोडप्यांमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफच्या नावाचाही समावेश झाला आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये दोघांचे लग्न पार पडले. यासह कतरिना आणि विकी आता पती-पत्नी बनले आहेत. त्यांचे नाते अधिकृत झाले आहे.
दोघांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. आज रात्री हे कपल लग्नाची रिसेप्शन पार्टी देणार आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचे विधी सुरू असताना, विकी कौशलने पंजाबी स्वॅगसह लग्नात प्रवेश केला होता. विकी कौशलने गुलाबी शेरवानी परिधान करून विंटेज कारमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती. त्याच्या प्रवेशाच्या वेळी ढोल वाजत होते.
सारा अली खान आणि आलिया भट्ट काही वेळापूर्वी खाजगी विमानतळावर स्पॉट झाले. दोन्ही अभिनेत्री एथनिक लूकमध्ये दिसल्या. त्यांचा हा लूक पाहून या दोघींनीही कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नाला उपस्थिती लावली असणार अशी चर्चा रंगली होती.
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात वरातीत येणाऱ्यांना मॅचिंग पगड्या घातल्याचं वृत्त होतं. यामध्ये सनी कौशल, कबीर खान, अंगद बेदी यांचा समावेश होता.
इंस्टाग्रामवर कतरिनाचा एक व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे, ज्यामध्ये ती सलमान खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये बघा कतरिना 'तेरे नाल में आवंगी' गाण्यावर कशी डान्स करताना दिसत आहे. कतरिनाचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना कल्पना येईल की ती तिच्या संगीत सेरेमनीमध्ये कशाप्रकारे डान्स केला असेल
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या केकची किंमत समोर आली आहे. बातमीनुसार, केकची किंमत 3-4 लाख आहे. रिसेप्शनसाठी 2 वेडिंग केकचे नियोजन करण्यात आले आहे. एक पाच मजली आणि दुसरा तीन मजली असेल. एक केक कारमेल, चॉकलेट विदेशी berries चव असेल.
तर 5 मजली केक व्हाईट वेडिंग केक आहे.