London Files: काश्मीर फाईल्स नंतर येतेय 'लंडन फाईल्स', जाणून घ्या कधी आणि कुठे होणार रिलीज 

बी टाऊन
Updated Apr 15, 2022 | 13:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

London Files Ott Release | ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज नवीन सीरिज रिलीज होत आहे. प्रेक्षकही चित्रपटगृहात जाण्याऐवजी घरात बसून या सीरिज आणि चित्रपटांचा आनंद घेण्यास प्राधान्य देत आहेत. सर्वच स्टार आता ओटीटीकडे वळत आहेत. यावेळीची बातमी अर्जुन रामपाल बाबतची आहे. तो वूट सिलेक्टच्या इन्वेस्टिगेटिव थ्रिलर 'लंडन फाईल्स'मध्ये गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसत आहे

Find out when, where and when the London Files series will be released
काश्मीर फाईल्स नंतर येतेय 'लंडन फाईल्स'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज नवीन सीरिज रिलीज होत आहेत.
  • काश्मीर फाईल्स नंतर आता लंडन फाईल्स येत आहे.
  • लंडन फाईल्सचा ट्रेलर रिलीज.

London Files Ott Release | मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज नवीन सीरिज रिलीज होत आहेत. प्रेक्षकही चित्रपटगृहात जाण्याऐवजी घरात बसून या सीरिज आणि चित्रपटांचा आनंद घेण्यास प्राधान्य देत आहेत. सर्वच स्टार आता ओटीटीकडे वळत आहेत. यावेळीची बातमी अर्जुन रामपाल बाबतची आहे. तो वूट सिलेक्टच्या इन्वेस्टिगेटिव थ्रिलर 'लंडन फाईल्स'मध्ये (London Files Trailer) गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसत आहे. या सीरिजमध्ये अर्जुन रामपालसोबत (Arjun Rampal) पूरब कोहली (Purab Kohli) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Find out when, where and when the London Files series will be released). 

अधिक वाचा : राज ठाकरेंच्या आंदोलनाचे उत्तरप्रदेशात उमटले पडसाद?

दरम्यान, या सीरिजमध्ये गोपाल दत्त, सपना पब्बी, मेधा राणा, सागर आर्य आणि अवा जेन विलीज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लंडन फाइल्स २१ एप्रिल २०२२ पासून प्रसारित होणार आहे. तुम्ही ही सीरिज वूट सिलेक्ट (Voot Select) वर पाहू शकाल. अलीकडेच त्याच्या ओम सिंग या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अर्जुन रामपालने उघड केले की तो एका खुनाचा गुप्तहेर आहे आणि लंडन या राजकीयदृष्ट्या विभाजित शहरात हरवलेल्या व्यक्तीचा खटला चालवतो. त्याच्या वैयक्तिक संघर्षात, ओमला मीडिया व्यक्तिमत्त्व अमर रॉयच्या (पूरब कोहली) हरवलेल्या मुलीची केस उचलण्यास भाग पाडले जाते. 

अधिक वाचा : मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरेंना रामराम!

लक्षणीय बाब म्हणजे या सीरिजमध्ये तपासादरम्यान एक खोल रहस्य समोर येते. त्याने हे देखील उघड केले की या पात्राच्या प्रवासाचा त्याच्यावर वैयक्तिकरित्या परिणाम झाला आहे, खरं तर त्याच्या अपेक्षेपेक्षा 'खूपच जास्त'. तसेच पूरब कोहली म्हणाला की, “रॉक ऑन नंतर पुन्हा अर्जुनसोबत सेटवर काम करणे खूप छान वाटले. 

लंडन फाईल्सचा ट्रेलर रिलीज 

 लंडन फाइल्सचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, त्याला यूट्यूब आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. Voot वर ही सीरिज पाहण्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करून सब्सक्राइब करावे लागेल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी