Alia Ranbir Wedding: रणबीर बनणार भट्ट कुटुंबाचा दुसरा जावई; जाणून घ्या कुठे आहे महेश भट्ट यांचा पहिला जावई 

Alia And Ranbir Marriage | बॉलिवूडचे बहुचर्चित कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. १३ ते १५ एप्रिल दरम्यान दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अशा परिस्थितीत लग्न आणि प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो सतत समोर येत आहेत.

Find out where is Mahesh Bhatt's first son-in-law Manish Makhija
जाणून घ्या कुठे आहे महेश भट्ट यांचा पहिला जावई   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडचे बहुचर्चित कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
  • १३ ते १५ एप्रिल दरम्यान दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
  • जा भट्ट आणि मनीष माखिजा यांची पहिली भेट २००३ मध्ये पाप चित्रपटाच्या शुटींग दरम्यान झाली होती.

Alia And Ranbir Marriage | मुंबई : बॉलिवूडचे बहुचर्चित कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. १३ ते १५ एप्रिल दरम्यान दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अशा परिस्थितीत लग्न आणि प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो सतत समोर येत आहेत. आलिया भट्टशी लग्न झाल्यानंतर रणबीर कपूर भट्ट कुटुंबाचा दुसरा जावई होईल. मात्र भट्ट कुटुंबातील पहिल्या जावईबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. एकूणच आपण भाष्य करत आहोत आलिया भट्टची मोठी बहीण पूजा भट्टचा पती मनीष माखिजा याच्याबद्दल. (Find out where is Mahesh Bhatt's first son-in-law Manish Makhija). 

अधिक वाचा : लिंबाच्या किमती वाढल्याने भन्नाट मिम्स व्हायरल 

एकेकाळी पूजा भट्टचे नाव रणवीर शौरी, बॉबी देओल, फरदीन खान या कलाकारांसोबत जोडले जायचे. मात्र तिला तिचे खरे प्रेम मनीष माखिजामध्ये सापडले. मात्र हे नाते तसे स्थिरावलं नाही ज्याबाबत सर्व चाहते कल्पना करत होते. मनीष माखिजा हा एक व्हिडिओ जॉकी आणि रेस्टॉरंटचा मालक आहे. याशिवाय तो अभिनय देखील करत होता. माखिजाने त्याचे शालेय शिक्षण दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून पूर्ण केले. याशिवाय त्यांनी एलएलबीलाही प्रवेश घेतला होता, पण त्याने ते मध्येच सोडून दिले होते. 

११ वर्षानंतर झाले वेगळे 

पूजा भट्ट आणि मनीष माखिजा यांची पहिली भेट २००३ मध्ये पाप चित्रपटाच्या शुटींग दरम्यान झाली होती. या चित्रपटात मनीषने एक छोटासा रोल देखील केला होता. दोघेही एकमेकांना पसंद आले आणि दोन महिन्यांच्या डेटिंग नंतर दोघांनी लग्न केले होते. मात्र हे नाते कायमचे नव्हते. दोघे ११ वर्ष एकत्र राहिले आणि नंतर २०१४ मध्ये वेगळे झाले. पूजा भट्ट मनीषला मुन्ना म्हणून हाक मारायची. वेगळे झाल्यानंतर दोघांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाही. पूजानेच मनीषपासून वेगळे होण्याची चर्चा केली होती. 

अधिक वाचा : १० पट वेगाने पसरणाऱ्या XE व्हेरिएंटचा भारतात शिरकाव?

पूजाने म्हटले होते की, "मी माझ्या इच्छेनुसार जगणे निवडले आहे. सर्टिफिकेटमुळे विवाह होत नाहीत किंवा नाते तुटत देखील नाही. जीवन असे करते, ज्यांना आमची काळजी नाही खासकरून जे करत नाहीत, मी त्यांना सांगते की मुन्ना आणि मी ११ वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झालो आहोत. हा निर्णय आम्ही आमच्या दोघांच्याही मताने हा निर्णय घेतला आहे. 

मनीष माखिजाचा आहे एका मुलाचा बाप 

खरं तर पूजा भट्टच्या आधी मनीष माखिजाने नेहा गुप्ता नावाच्या महिलेशी लग्न केले होते. या दोघांना एक मुलगा असल्याचे देखील बोलले जाते. मनीष पूजापासून दूर गेल्यानंतर आपल्या मुलाला वेळ देत आहे आणि त्याच्या जीवनाचा महत्त्वाचा पैलू बनला आहे. पूजा भट्ट सोबत मनीष माखिजाला कोणतेही अपत्य नाही आहे. मनीष माखिजा शेवटच्या वेळी लव शुव ते चिकन खुराना या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यांने लोकल माफियांची भूमिका साकारली होती. यानंतर मनीष पडद्यावर दिसला नाही. आजकाल तो काय करतोय याची माहिती नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी