First look of 'GoodBye' is out: अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना 'या' सिनेमात एकत्र दिसणार, ७ ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होणार

बी टाऊन
Updated Jul 24, 2022 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

First look of 'GoodBye' is out: बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या'गुडबाय' (GoodBye) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपटाच्या नवीन पोस्टरनुसार हा चित्रपट 7 ऑक्टोबरला सिल्व्हर स्क्रीनवर दाखल होणार आहे. या चित्रपटात बिग बी आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) एकत्र दिसणार आहेत. या सिनेमातून रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

First look of film 'GoodBye'
अमिताभ बच्चन-रश्मीका मंदान्नाच्या 'GoodBye'चा फर्स्ट लूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमिताभ बच्चन-रश्मीका मंदान्नाच्या 'GoodBye'चा फर्स्ट लूक
  • 'GoodBye' सिनेमाद्वारे रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे
  • कुटुंब आणि नातेसंबंधांची हृदयस्पर्शी कथा सिनेमातून मांडण्यात आलेली आहे.

Amitabh Bachchan Movie: बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) आणि दक्षिणेतील सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना  (Rashmika Mandana)यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'गुडबाय' या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टरही रिलीज केले आहे. यासोबतच चित्रपटातील कलाकारांचीही माहिती देण्यात आली आहे. या सिनेमातून रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्यासाठी हा सिनेमा खूप खास आहे. ट्विट करून रश्मिकाने याबाबत माहिती दिली आहे. (First look of film 'GoodBye'starring Amitabh Bachchan and Rashmika Mandana is out)


चित्रपटाच्या नवीन पोस्टरनुसार हा चित्रपट 7 ऑक्टोबरला सिल्व्हर स्क्रीनवर दाखल होणार आहे. या चित्रपटात बिग बी आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना  (Rashmika Mandana) एकत्र दिसणार आहेत. याशिवाय नीना गुप्ता,(Neena Gupta) एली अवराम (Elli Avram) आणि सुनील ग्रोवर (Sunil Grover) आणि साहिल मेहता हे देखील या चित्रपटात आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये गुडबायचे संपूर्ण कलाकार एकत्र दिसत आहेत. सर्वजण एकत्र टीव्हीवर सामना पाहत असल्याचे दिसते. यासोबतच फोटोमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर हास्यही स्पष्ट दिसत आहे.

अधिक वाचा : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणं आता थांबवा"

फोटोमध्ये दोघेही सोफ्यावर स्वेटशर्ट घातलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले आहेत. अमिताभ निळ्या रंगाच्या हुडीमध्ये तर रश्मिका पिवळ्या हुडीमध्ये दिसत आहे. त्याचवेळी रश्मिका हातात पॉपकॉर्न घेताना दिसत आहे. याशिवाय नीना गुप्ता जमिनीवर बसल्या आहेत. रश्मिका मंदान्ना या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा सिनेमा खास आहे. पहिल्याच सिनेमात रश्मिकाने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली आहे.

गुडबाय या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रश्मिकाने ही बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली. रश्मिकाने ट्विट करत म्हटले आहे, "मला इतकेच सांगायचे आहे की हा माझा हिंदी डेब्यू चित्रपट - गुडबाय! @SrBachchan सर @Neenagupta001 ma'am सोबत. #VikasBahl आणि एक मस्त कलाकार @pavailkgulati #SahilMehta #Abhishek आणि असे बरेच अप्रतिम अभिनेते आणि तंत्रज्ञ."

अधिक वाचा : LPG सबसिडी बंद केल्याने सरकारी तिजोरीत हजारो कोटी रुपये


‘गुडबाय’ हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे. यात कुटुंब आणि नातेसंबंधांची हृदयस्पर्शी कथा आहे. हा चित्रपट तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत पाहू शकता. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी